YouTube चं युजर्ससाठी खास गिफ्ट! हाय क्वालिटी ऑडिओपासून AI-जनरेटेड रेडियो स्टेशनपर्यंत मिळणार हे खास फीचर्स
गूगलच्या मालकीचे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब त्यांच्या युजर्ससाठी काही नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचर्सवर सध्या चाचणी सुरु असून ते लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युट्यूबने त्यांच्या प्रिमीयम युजर्ससाठी काही फीचर्स मोफत उपलब्ध करून दिली आहेत. या फीचर्समध्ये हाय क्वालिटी ऑडिओपासून ते AI-जनरेटेड रेडियो स्टेशनपर्यंत अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
सध्या YouTube Premium वापरकर्ते कोणतेही पैसे न भरता कंपनीचे नवीन फीचर्स वापरण्यासाठी सक्षम असणार आहेत. या नवीन फीचर्सवर सध्या प्रयोग सुरु आहे. ऑडिओ ऐकण्याचा आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव सुधारण्यासाठी या वैशिष्ट्यांची चाचणी केली जात आहे. या नवीन फीचर्समुळे युट्यूब युजर्स अधिक चांगल्या क्वालिटीमध्ये ऑडिओ ऐकण्याचा आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. हे फीचर्स सध्या फक्त YouTube Premium वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहेत. हे नवीन फीचर्स इतर युट्यूब युजर्ससाठी कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
युट्यूबने प्रिमियम युजर्ससाठी उपलब्ध केलेल्या नवीन फीचर्समध्ये हाय क्वालिटी ऑडियो, AI-जनरेटेड रेडियो स्टेशन, जंप अहेड ऑन वेब, iOS वर पिक्चर इन पिक्चर, यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या नवीन फीचर्सबद्दल सर्वच युजर्सना प्रचंड उत्सुकता लागली आहे. चला तर मग या फीचर्सविषयी अधिक जाणून घेऊया.
हाय क्वालिटी ऑडिओ- ऑडिओ सुधारण्यासाठी YouTube हाय क्वालिटी ऑडिओ वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. यामध्ये युजर्सना म्युझिक व्हिडिओवर 256kbps ऑडिओ ऑफर करण्यात येत आहे. यामुळे ऑडिओ स्पष्टतेने आणि खोलवर ऐकू येतो.
AI-जनरेटेड रेडियो स्टेशन- कंपनी YouTube Music मध्ये AI-जनरेटेड रेडियो स्टेशनची देखील चाचणी करत आहे. यामध्ये वापरकर्त्यांना त्यांची निवड सूचित करावी लागेल. यानंतर, YouTube चे AI मॉडेल त्याच आधारावर ट्रॅकलिस्ट तयार करेल. हे फीचर युजर्सना प्रचंड फायद्याचं ठरणार आहे.
जंप अहेड ऑन वेब- हे वैशिष्ट्य मोबाइलवर आधीच उपलब्ध आहे. आता हे प्रीमियम वापरकर्त्यांसाठी वेबवर देखील आणले जात आहे. यामध्ये, वापरकर्ते डेस्कटॉपवर ब्राउझ करताना व्हिडिओचे सर्वोत्तम भाग थेट अॅक्सेस करण्यास सक्षम असतील. याशिवाय प्लॅटफॉर्मवर प्लेबॅक स्पीडचे आणखी पर्याय जोडले जात आहेत. आता यूजर्स 4x स्पीडनेही व्हिडिओ पाहू शकतील.
iOS वर पिक्चर इन पिक्चर आणि शॉर्ट्ससाठी स्मार्ट डाउनलोड – आता मल्टीटास्किंग करताना शॉर्ट्स पाहणे सोपे होईल. कंपनी iOS वर प्रीमियम वापरकर्त्यांसाठी शॉर्ट्ससाठी पिक्चर इन पिक्चर मोडची चाचणी करत आहे. त्याचप्रमाणे ऑफलाइन पाहण्यासाठी शॉर्ट्स डाउनलोड करणेही सोपे होणार आहे.
Samsung घेऊन येतोय आतापर्यंतचा सर्वात स्लिम Smartphone! फ्लॅट डिझाईनसह मिळणार हे फीचर्स
सध्या YouTube त्यांच्या प्रीमियम वापरकर्त्यांसह त्यांची चाचणी घेत आहे. चाचणीनंतर, कंपनी यासह पुढे जाऊ शकते किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आतापर्यंत, कंपनी आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी हे नवीन फीचर्स कधी उपलब्ध करून देणार याबाबत अद्याप माहिती नाही.