1 जानेवारीपासून या स्मार्टफोन्समध्ये बंद होणार WhatsApp! लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना?
मेटाने जाहीर केलं आहे की, 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲप काही स्मार्टफोनवर काम करणं बंद करणार आहे. या स्मार्टफोनची यादी देखील मेटाने शेअर केली आहे. या यादीमध्ये सॅमसंग आणि HTC च्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. मेटाने यादीमध्ये सांगितलेल्या स्मार्टफोन्सवर 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲप बंद होणार आहे. त्यामुळे यादीमधील कोणताही फोन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करणं गरेजचं आहे.
‘Poco C75 5G’ ला टक्कर देणार ‘itel’ चा हा आगामी स्मार्टफोन, इतकी असणार किंमत
मेटाने सांगितलं आहे की, किटकॅट किंवा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अंड्रॉईड स्मार्टफोन्सवर 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲप बंद होणार आहे. अँड्रॉईड किटकॅट 2013 मध्ये रिलीझ झाले होते, परंतु आता बहुतेक फोन नवीन वर्जनचा वापर करतात. त्यामुळे मेटाने निर्णय घेतला आहे की 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲप किटकॅट किंवा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनवर काम करणार नाही. याची यादी देखील कंपनीने शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीचे म्हणणे आहे की जुन्या वर्जनमध्ये नवीन अपडेट्स योग्यरित्या चालवण्यात अडचण येत आहे, ज्यामुळे फोनची सुरक्षा आणि त्याच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. जेव्हा व्हॉट्सॲप या फोनवर काम करणे थांबवते, तेव्हा या फोनवर व्हॉट्सॲपसाठी कोणतेही अपडेट, सोल्यूशन किंवा सिक्योरिटी सोल्यूशन नसतील.
अनेक जुन्या फोनला या निर्णयाचा फटका बसणार असून त्यात सॅमसंग, एलजी आणि सोनी यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या काही जुन्या मॉडेल्सचा समावेश आहे. हे फोन 10 वर्षांहून अधिक काळापासून बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये अँड्रॉइडच्या नवीन वर्जनवर अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे जेणेकरून ते व्हॉट्सॲप वापरू शकतील. मेटाने जुन्या फोनवर व्हॉट्सॲप बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. व्हॉट्सॲपचा वापर करताना युजर्सना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Apple च्या अपकमिंग iPhone पेक्षाही पातळ असेल Samsung चा हा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स झाले लिक
कंपनाीने अँड्रॉईड फोनची संपूर्ण यादी शेअर केली आहे ज्यावर काही दिवसांनंतर व्हॉट्सॲप बंद होणार आहे.
Samsung: Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini
Motorola: Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014
HTC: One X, One X+, Desire 500, Desire 601
LG: Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
Sony: Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V
अँड्रॉईडशिवाय 2025 पासून जुन्या iOS फोनवर देखील व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे. तुम्ही आयफोनचे iOS 15.1 पेक्षा जुने वर्जन वापरत असाल, तर 5 मेनंतर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे. या निर्णयाचा परिणाम iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus सारख्या जुन्या फोनवर होणार आहे.