ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी (Photo Credit- X)
Online Gaming Bill: आता Dream 11, MPL, Binzo यांसारख्या लोकप्रिय ॲप्सवर मोठी कारवाई होणार आहे. संसदेने मंजूर केलेल्या ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनीही संमती दिली आहे, ज्यामुळे आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या नव्या कायद्यामुळे ऑनलाइन मनी गेम्सवर (पैशांचे खेळ) सरकारची पकड घट्ट होणार आहे.
नवीन कायद्यानुसार, Dream 11, MPL, Binzo, रमी, MPL लुडो, पोकर, तीन पत्ती यांसारखे जेवढेही ऑनलाइन गेम्स आहेत, ज्यात पैसे लावले जातात किंवा जिंकले जातात, त्या सर्वांवर बंदी घालण्यात येईल. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
President Murmu gives assent to Online Gaming Bill
Read @ANI Story | https://t.co/uWo10js6LI#DroupadiMurmu #OnlineGamingBill #NewDelhi pic.twitter.com/fCc5VOYwuq
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2025
ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५ आणण्याचा मुख्य उद्देश केवळ मनी गेम्सवर बंदी घालणे नसून, ई-स्पोर्ट्सला (e-Sports) प्रोत्साहन देणे हा देखील आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन बेटिंग आणि रिअल मनी गेमिंग वगळता इतर कोणत्याही ई-स्पोर्ट्सवर बंदी येणार नाही. या नव्या कायद्यामुळे ई-स्पोर्ट्सला आता अधिकृत खेळाचा दर्जा मिळणार आहे.
खेळ मंत्रालय यासंदर्भात लवकरच नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. याशिवाय, ई-स्पोर्ट्सला चालना देण्यासाठी ट्रेनिंग ॲकॅडमी आणि रिसर्च सेंटर्स उभारण्यात येतील. तसेच, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ई-स्पोर्ट्सचा राष्ट्रीय क्रीडा धोरणात समावेश केला जाईल. यामुळे देशातील ई-स्पोर्ट्स खेळाडूंना अधिक चांगल्या संधी मिळतील.
ड्रीम ११ ही कंपनी पूर्णपणे ऑनलाइन मनी गेमिंगवर आधारित आहे आणि आता यावर बंदी येणार असल्याने कंपनीला मोठा फटका बसणार आहे. कंपनी बीसीसीआयसोबतचा करार तात्काळ रद्द करेल की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या या कराराला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, आणि बीसीसीआयला आतापर्यंत अर्ध्याहून अधिक रक्कम मिळाली आहे. मात्र, उर्वरित रक्कम कराराच्या भवितव्यावर अवलंबून असेल.
या नवीन नियमांचा फटका केवळ ड्रीम ११ लाच नाही, तर माय ११ सर्कल (My 11 Circle) सारख्या इतर मोठ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनाही बसू शकतो. माय ११ सर्कलचाही बीसीसीआयसोबत करार आहे. २०२४ मध्ये, आयपीएलने (IPL) पाच हंगामांसाठी माय ११ सर्कलसोबत ६२५ कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार, माय ११ सर्कल आयपीएलचे मुख्य फॅन्टसी गेमिंग प्रायोजक बनले.