Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X लवकरच बनणार Super App! Online Payment आणि टीव्ही सारखे फीचर्स देण्याची तयारी सुरु, काय आहे कंपनीचा प्लॅन

2025 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स एका नव्या शिखरावर जाण्याच्या तयारीत आहे. लवकरच एक्स एक 'एव्हरीथिंग ॲप' म्हणून सर्वांसमोर येईल, ज्यामध्ये युजर्सना ऑनलाईन पेमेंटपासून एआयपर्यंत सर्व सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 08, 2025 | 09:49 AM
X लवकरच बनणार Super App! Online Payment आणि टीव्ही सारखे फीचर्स देण्याची तयारी सुरु, काय आहे कंपनीचा प्लॅन

X लवकरच बनणार Super App! Online Payment आणि टीव्ही सारखे फीचर्स देण्याची तयारी सुरु, काय आहे कंपनीचा प्लॅन

Follow Us
Close
Follow Us:

एलोन मस्कच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स नवीन वर्षात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती, की एक्स आता लवकरच सुपर अ‍ॅप होणार आहे. या एका अ‍ॅपमध्ये युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत. आता या सुपर अ‍ॅपची तयारी सुरु झाली आहे. कंपनीने एक्समध्ये नवीन फीचर्स अ‍ॅड करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता एक्स युजर्सना लवकरच ऑनलाईन पेमेंट आणि टिव्ही सारख्या फीचर्सचा अ‍ॅपवर लाभ घेता येणार आहे.

OnePlus 13 Series अखेर भारतात लाँच, 6000 mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज! इतकी आहे किंमत

2025 च्या सुरुवातीलाच एक्सवर मनी ट्रान्सफर आणि टीव्ही सारखे फीचर्स अ‍ॅड केले जाणार आहेत. ज्यामुळे सुपर ॲप बनण्याच्या प्रक्रियेत एक्स एक पाऊल पुढे आला आहे. या फीचर्ससोबतच AI चॅटबॉट Grok मध्ये अनेक नवीन अपग्रेड देखील उपलब्ध असतील. एलोन मस्कने सांगितलं होतं की त्याला एक्सला सुपर ॲप म्हणजेच ‘एव्हरीथिंग ॲप’ बनवायचे आहे. याचा अर्थ एकाच ठिकाणी युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत. जेणेकरुन वापरकर्त्यांना कोणत्याही सेवेसाठी इतर कोणतेही ॲप शोधावे लागणार नाही. आता एव्हरीथिंग ॲप बनण्याची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच नवीन फीचर्स युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

माजी सीईओ नवीन मार्गांनी कनेक्ट होतील

कंपनीच्या नवीन वर्षाच्या योजनांची घोषणा करताना, X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी सांगितले की 2024 मध्ये X ने जग बदलले होते. आता तुम्हीच मीडिया आहात. 2025 मध्ये तुम्हाला पूर्णपणे नवीन मार्गांनी जोडेल. या वर्षी X TV, X Money, Grok आणि बरेच काही येत आहे. या सर्व नवीन गोष्टींसाठी तयार व्हा. हे दर्शविते की कंपनीने 2025 साठी तयारी केली आहे. 2025 मध्ये एक्स एका नव्या शिखरावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

x Money

एक्सवर युजर्सना ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा मिळावी यासाठी कंपनी लवकरच मनी ट्रान्सफर सेवा देखील सुरु करणार आहे. त्याच्या पेमेंट सेवेसाठी, कंपनीने या महिन्यात @XMoney नावाचे अधिकृत अकाऊंट देखील तयार केले आहे. आतापर्यंत त्याचे 1.53 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या सेवेबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु लोकांचा असा विश्वास आहे की यामध्ये Dogecoin इत्यादी डिजिटल मालमत्तांचा समावेश केला जाऊ शकतो.

Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स

x टीव्ही

हे X प्लॅटफॉर्मवरील मल्टीमीडिया अनुभव बदलेल. याबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, मात्र त्यामुळे X वरील ऑडियो-विजुअल क्षमता वाढणार असल्याचे मानले जात आहे. यावर, वापरकर्त्यांना लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ऑन-डिमांड कंटेटची सुविधा मिळू शकते.

Grok AI

X चा Grok AI चॅटबॉट आधीच लाइव्ह आहे आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा देत आहे. त्यात या वर्षात अनेक महत्त्वाचे अपडेट्स पाहता येतील.

Web Title: Tech news x will become super app soon you will get features like online payment and tv know the plan of company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • elon musk
  • tech updates

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
1

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
4

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.