OnePlus 13 Series अखेर भारतात लाँच, 6000 mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज! इतकी आहे किंमत
स्मार्टफोन कंपनी OnePlus ने अखेर त्यांची नवीन सिरीज OnePlus 13 भारतात लाँच केली आहे. 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये ही नवीनतम सिरीज लाँच करण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच चीनमध्ये ही सिरीज लाँच केली होती. त्यानंतर आता भारतात देखील ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. OnePlus 13 सिरीजमध्ये कंपनीने OnePlus 13 आणि Oneplus 13R असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ही सिरीज प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आली आहे.
Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स
कंपनीने Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह OnePlus 13 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कर्व्ड डिस्प्लेच्या जागी फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे आणि कॅमेरा बंपच्या डिझाइनमध्येही थोडा बदल करण्यात आला आहे. कंपनी ओपन सेलमध्ये एक्सचेंज बोनस, इन्स्टंट बँक डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय, फ्री प्रोटेक्शन प्लान, लाइफटाइम वॉरंटी आणि मेंबरशिप एक्सक्लुझिव्ह फायदे इ. ऑफर करत आहे. भारतात या सिरीजमधील स्मार्टफोनची किंमत काय आहे आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 13 स्मार्टफोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच BOE X2 2K+ AMOLED डिस्प्ले आहे. हे 4,500 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. याचा अर्थ स्क्रीन पाहण्यासाठी तुम्हाला सावली शोधावी लागणार नाही. सूर्यप्रकाशातही ही स्क्रीन सहज दिसेल. हे स्नॅपड्रॅगन 85 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा डिवाइस 24GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेज सह भारतात लाँच करण्यात आला आहे.
oneplus 13 तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB/256GB, 16GB/512GB आणि 24GB/1TB यांचा समावेश आहे. 12GB/256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आहे. 16GB/512GB व्हेरिअंटसाठी तुम्हाला 76,999 रुपये द्यावे लागतील. 24GB/1TB स्टोरेज मॉडेल 89,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहे.
वनप्लसचा फ्लॅगशिप फोन 10 जानेवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. OnePlus ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 5,000 रुपयांची झटपट सूट देत आहे. ज्यामुळे हे तिन्ही मॉडेल तुम्ही अनुक्रमे 64,999 रुपये, 71,999 रुपये आणि 84,999 रुपयांना खरेदी करु शकता.
OnePlus 13R मध्ये LTPO 4.1 तंत्रज्ञान आणि 4,500 nits पीक ब्राइटनेससह 6.78-इंच 120Hz ProXDR AMOLED डिस्प्ले आहे. फोनला दोन्ही बाजूंनी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण मिळाले आहे. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC आहे. हे 12/16GB LPDDR5x रॅम आणि 256GB/512GB UFS 4.0 स्टोरेजसह येते. OnePlus 13 देखील 6,000mAh सह येतो, परंतु 80W SUPERVOOC चार्जिंगसह आणि वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट नाही. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालतो. OnePlus 13 प्रमाणे, याला देखील अपडेट पॉलिसीचे वचन दिले आहे.
आता आरशात पाहा आणि फीट राहा! लवकरच लाँच होणार ‘Smart Mirror’, चेहरा वाचून सांगणार तुमचे हेल्थ अपडेट
OnePlus 13R दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB/256GB आणि 16GB/512GB यांचा समावेश आहे. OnePlus 13R स्मार्टफोनच्या 12GB/256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 42,999 रुपये आणि 16GB/512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आहे. नवीन स्मार्टफोन 13 जानेवारीपासून ओपन सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. OnePlus 13 प्रमाणे, OnePlus देखील 13R सह लाँच ऑफर देत आहे, दोन्ही व्हेरिअंट तुम्ही अनुक्रमे 39,999 आणि 46,999 रुपयांना खरेदी करू शकता.