फ्री! फ्री! फ्री! 60,000 रुपयांची Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार 'हे' काम
टेक कंपनी सॅमसंग त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आली आहे. हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सॅमसंगचे प्रीमियम स्मार्टवॉच मोफत मिळणार आहे. होय, सॅमसंगचं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 60 हजार रुपयांचं Samsung Galaxy Watch Ultra मोफत मिळणार आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत, आणि या 30 दिवसांत तुम्हाला सॅमसंगचे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. चला तर मग सॅमसंगने त्यांच्या युजर्ससाठी कोणतं चॅलेंज सुरु केलं आहे, तुम्ही या चॅलेंजमध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकता, याबद्दल जाणून घेऊया.
कंपनी त्यांच्या युजर्सना सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा जिंकण्याची संधी देत आहे. ही खास संधी 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. सॅमसंगने ‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंजची घोषणा केली आहे. सॅमसंगने हेल्थ अॅपच्या वापरकर्त्यांसाठी ही घोषणा केली आहे. जर तुम्ही देखील सॅमसंग हेल्थ अॅपचे वापरकर्ते असाल, तर तुम्ही चॅलेंज पूर्ण करून सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा मोफत जिंकू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे ‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांना 30 दिवसांत 200,000 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय, #WalkathonIndia हा हॅशटॅग वापरून, सहभागींना सॅमसंग मेंबर्स अॅपवर पूर्ण केलेल्या स्टेप्सच्या संख्येचा स्क्रीनशॉट देखील अपलोड करावा लागेल. 3 भाग्यवान विजेत्यांची निवड लकी ड्रॉणे केली जाईल आणि 3 लोकांना 59,999 रुपयांचे प्रीमियम स्मार्टवॉच सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा दिलं जाणार आहे.
सॅमसंगच्या फ्री वॉच चॅलेंजमध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्ता असणे आवश्यक आहे. सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्ते वॉक-अ-थॉन चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सॅमसंग हेल्थ अॅपवर जा. यानंतर ‘टुगेदर’ विभागात जा. येथे तुम्हाला वॉक-अ-थॉन इंडिया चॅलेंजमध्ये सामील होऊन तुमच्या स्टेप्सचा मागोवा घ्यावा लागेल. 200,000 स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी #WalkathonIndia सह सॅमसंग मेंबर्स अॅपवर पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करा. यानंतर तुम्हाला देखील सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा मोफत मिळवण्याची संधी मिळू शकेल.
कंपनीने गॅलेक्सी वॉच अल्ट्रा 47 मिमी आकाराच्या व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. सॅमसंग वॉच अल्ट्राची बॉडी बनवण्यासाठी टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्राच्या डिस्प्लेमध्ये सैफायर ग्लास वापरण्यात आलं आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वॉटर रेझिस्टन्स फीचर देण्यात आले आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वापरकर्त्यांना पॉवर सेव्हिंगसह 100 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. कंपनीने वॉच अल्ट्रामध्ये ड्युअल फ्रिक्वेन्सी जीपीएस सिस्टम बसवली आहे, जी लोकेशन ट्रॅक करण्यास मदत करेल.
Vi Number Rakshak: महाकुंभात हरवलेले कुटूंबिय आता पुन्हा एकत्र येणार, VI ने सुरु केली विशेष सुविधा!
गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये वापरकर्त्यांसाठी कस्टमाइझ करण्यायोग्य क्विक बटण देण्यात आले आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये डबल पिंच जेश्चर कंट्रोल्स फीचर देखील देण्यात आले आहे, जेणेकरून स्मार्टवॉट वापरणं अधिक सोपे होईल. वापरकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये सॅमसंग हेल्थ पर्याय देण्यात आला आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक हेल्थ मोड्स समाविष्ट केले आहेत.






