Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या

TV Tips Marathi: नवीन टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या घरासाठी कोणत्या आकाराचा टिव्ही योग्य असणार आहे, याबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2025 | 10:59 AM
Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या

Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात टीव्ही ही प्रत्येकाची गरज बनली आहे. हल्ली बाजारात स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. या टीव्ही आपण अगदी एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे वापरू शकता. या टीव्हीमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचा देखील समावेश असतो. युट्युबपासून डिस्नी हॉटस्टारपर्यंत आपण सर्व काही स्मार्ट टीव्हीवर पाहू शकतो. स्मार्ट टीव्ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.

Tech Tips: पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? प्रवासादरम्यान हे गॅझेट्स तुमच्यासाठी ठरतील वरदान

तुम्ही देखील नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन टीव्ही खरेदी करताना अनेकजण गोंधळलेले असतात. कोणत्या आकाराचा टिव्ही आपल्या घरासाठी योग्य ठरेल याबाबात अनेकांना कळत नाही. तुम्ही देखील यापैकी एक असल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा काही टिप्स आहेत ज्याच्या मदतीने तुमच्या तुमच्या घरासाठी कोणत्या आकाराचा टीव्ही योग्य ठरेल हे तुम्ही ठरवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणत्या आकाराचा टीव्ही खरेदी करावा यासाठी अनेकांच्या मनात गोंधळ असतो. टीव्हीचा आकार जेवढा मोठा असेल तेवढा तो आपल्या घरासाठी योग्य असेल असं अनेकांना वाटतं, पण असं नाहीये. योग्य आकाराचा टीव्ही खरेदी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चुकीच्या आकाराचा टीव्ही तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव खराब करू शकतो. आता आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही ठरवू शकता की कोणता आकाराचा टीव्ही तुमच्यासाठी योग्य असणार आहे.

टीव्हीचा आकार एका कोपऱ्यापासून कोपऱ्यापर्यंत मोजला जातो. जर तुम्ही पाच फुटाच्या अंतरावरून टीव्ही पाहत असाल तर 32 किंवा 40 इंचाचा टीव्ही तुमच्या घरासाठी योग्य असणार आहे. यामुळे तुम्हाला टीव्ही पाहण्याची मजा देखील येईल आणि तुमचे डोळे देखील खराब होणार नाही. जर तुम्ही सहा किंवा सात फुटाच्या अंतरावरून टीव्ही पाहत असाल तर अशावेळी तुमच्यासाठी 45 ते 50 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे. जर तुम्ही आठ फूट किंवा त्याहून अधिक अंतरावर बसून टीव्ही पाहत असाल तर 55 ते 65 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे.

Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

नवीन टीव्ही खरेदी करताना तिचा आकार लक्षात ठेवणं महत्त्वाचा आहे. टीव्हीची जाडी आणि त्याची रुंदी अत्यंत महत्त्वाची असते. तुम्ही तुमच्या बेडरुमसाठी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल यासाठी 32 किंवा 43 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे. लिव्हिंग रुमसाठी 50 इंच आकारासाठी टीव्ही तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. जर तुम्ही 4K टीव्ही खरेदी करत असाल, तर थोडे जवळ बसून तुम्ही चांगला अनुभव घेऊ शकता कारण चित्र खूप शार्प आहे, तर फुल एचडी (1080p) टीव्हीसाठी, चित्र स्पष्टपणे पाहण्यासाठी तुम्हाला थोडे दूर बसावे लागेल.

Web Title: Tech tips how to choose right tv size for room know with some tricks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन
1

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
2

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
3

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
4

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.