Tech Tips: ईयरबड्सचा वापर करताय? मग आत्ताच या गोष्टींची काळजी घ्या, नंतर पश्चाताप नको
ईअरफोन की ईयरबड्स असा प्रश्न कोणालाही विचारला तर तुम्हाला ईयरबड्स असंच उत्तर ऐकायला मिळेल. कारण ईयरबड्स क्लासी आणि फॅशनेबल वाटतात. ईअरफोनची केबल संभाळण्यापेक्षा अनेकांना स्टायलिश ईयरबड्सचा वापर करायला आवडतं. तुम्ही असे अनेकजण पाहिले असतील जे महागडे ईयरबड्स खरेदी करतात, पण त्यांची काळजी कशी घ्यावी हेच माहित नसतं. ईयरबड्स दिसायला कितीही स्टायलिश वाटत असेल तरी ते नाजूक असतात, त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
इअरबड्स हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. संगीत ऐकणे असो, कॉल अटेंड करणे किंवा ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी होणे असो, इअरबड्स सर्वत्र उपयोगी पडतात. त्यामुळे आपल्या इअरबड्सची योग्य प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं असतं. (फोटो सौजन्य – pinterest)
इअरबड्स स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड, मऊ ब्रश (जुना टूथब्रश देखील वापरू शकता), किंचित ओलसर कापड किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल (70 % किंवा अधिक) अशा गोष्टींचा वापर करा.
इयरबड्स साफ करण्यापूर्वी, ते बंद आणि चार्जिंग केसच्या बाहेर असल्याची खात्री करा. मायक्रोफायबर कापडाने इअरबड्सची बाह्य पृष्ठभाग पुसून टाका. स्पीकर ग्रिलमध्ये साचलेली घाण किंवा लहान छिद्रे ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ करा. इअरबड्समध्ये कोणतेही द्रव जाणार नाही याची खात्री करा.
चार्जिंग केस कोरड्या किंवा ओल्या कापडाने स्वच्छ करा. पिन आणि कनेक्टरवर जास्त दबाव लागू करू नका. पाणी वापरू नका, विशेषतः जर इअरबड्स वॉटरप्रूफ नसतील तर पाण्याचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. इयरबड्स नियमितपणे स्वच्छ करा, विशेषत: जर तुम्ही दररोज इअरबड वापरत असाल तर नियमित स्वच्छता करणं गरेजचं आहे. साफ केल्यानंतर त्यांना पूर्णपणे कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर इयरबड्सचा वापर करा.
जरी इअरबड्स आता वॉटरप्रूफ येऊ लागले आहेत, तरीही ते पाणी किंवा ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवले पाहिजेत. तुम्ही विशेषतः आंघोळ करताना किंवा पाऊस पडत असताना इअरबड्स वापरणे टाळावे. याशिवाय पाणी किंवा घामामुळे त्याच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्सलाही नुकसान होऊ शकते. तुमच्या या चुकीमुळे इअरबड्स काम करणे बंद करू शकतात.
इअरबड्स वापरल्यानंतर, केसमध्ये ठेवण्याऐवजी ते इकडे तिकडे फेकण्याची चूक करू नका. अशा स्थितीत तुमचा इअरपीस खराब होऊ शकतो. इअरबड्स नेहमी त्यांच्या चार्जिंग केस किंवा बॅगमध्ये ठेवा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि जास्त काळ टिकतील.
इअरबड्स खूप जास्त आवाजात वापरू नयेत. यामुळे त्यांचे स्पीकर खराब होऊ शकतात आणि आवाजाची गुणवत्ता कमी होऊ शकते. एवढेच नाही तर तुमच्या या चुकीमुळे इअरबड लवकर खराब होऊ शकतात. तसेच यामुळे तुमच्या कानाला देखील त्रास होऊ शकतो.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
इअरबड्स सतत चार्ज करत राहिल्याने त्यांची बॅटरी खराब होऊ शकते. याव्यतिरिक्त, बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर चार्ज केल्याने तिचे जीवनचक्र कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, इयरबड्सची बॅटरी 20-80% च्या दरम्यान आहे याची खात्री करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि जास्त चार्जिंग टाळावे.
एकाच वेळी अनेक डिव्हाइससह इयरबड जोडणे आणि अनपेअर केल्याने त्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे सॉफ्टवेअर समस्या उद्भवू शकते. तसेच, कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या असू शकतात.