Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल
Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
मार्केट आणि ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला यूएसबी लाइट्स अगदी सहज मिळतील. पावर बँकचा वापर करून तुम्ही अगदी सहज यूएसबी लाइट्सचा वापर नाईट लँप म्हणून करू शकता. घराच्या सजावटीव्यतिरिक्त, तुम्ही कॅम्पिंग इत्यादी ठिकाणी याचा वापर करू शकता. वीज नसेल किंवा तुम्ही रात्री अभ्यास करत असाल तर अशावेळी तुम्हाला नक्कीच लँपची गरज पडते. अशा परिस्थितीत यूएसबी लाइट्स लावून तयार केलेला लँप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्याप्रमाणे तुम्ही पावर बँकचा वापर करून नाईट लँप तयार केला अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एक छोटा पंखा देखील वापरू शकता. यूएसबी लाइट्स प्रमाणेच यूएसबी पंखे देखील बाजारात उपलब्ध आहेत. हे पंखे पावर बँकमध्ये प्लग-इन करताच तुम्हाला थंड हवा मिळेल आणि उष्णतेपासून सुटका देखील मिळणार आहे. तुम्ही ऑफिसपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्वत्र या प्रकारच्या पंख्याचा वापर करू शकता.
यूएसबी लाइट्स आणि यूएसबी पंख्यांप्रमाणेच तुम्ही पावर बँकच्या मदतीने सिसिटिव्हीचा वापर देखील करू शकता. यूएसबी केबलच्या मदतीने तुम्ही सिसिटिव्ह पावर बँकला कनेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही नवीन वीज कनेक्शन देखील घ्यावे लागणार नाही.
गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी
जर तुम्ही कंटेट क्रिएटर असाल किंवा फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला लाईट्सवर जास्त खर्च करावा लागतो. पण आता असं होणार नाही. कारण तुम्ही पावर बँकला कनेक्ट होणारी रिंग लाईट खरेदी करू शकता. याची किंमत देखील कमी असते आणि दुसरा फायदा म्हणजे याचा वापर करण्यासाठी विजेची गरज नसते. रिंग लाईट पॉवर बँकचा वापर पॉवर सोर्स म्हणून करेल आणि तुम्ही ते बाहेरील शूट किंवा फोटोग्राफीसाठी देखील वापरू शकाल.






