Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!
व्हॉट्सॲप हे जगभरात वापरलं जाणार मॅसेजिंग ॲप आहे. आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप असतो. जगातील करोडो आणि अब्जावधी लोक दररोज मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप वापरतात. चॅटिंगसोबतच व्हॉट्सॲप व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा देते. व्हॉट्सॲपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे त्याचा वापर अतिशय सोपा होत आहे. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते.
अनोळखी नंबर ब्लॉक करताय? फक्त फोनमध्ये करा ही सोपी सेटिंग, क्षणार्धात होईल या कॉल्सपासून सुटका
व्हॉट्सॲप फीचर्समध्ये व्हिडीओ कॉल बॅकग्राऊंड, व्हॉईस नोट अपडेट, मॅसेजिंग अपडेट, अशा अनेकांचा समावेश आहे. या सर्व फीचर्समुळे युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करणं अधिक सोपं झालं आहे. पण व्हॉट्सॲपचा वापर करताना काहीवेळा आपला डेटा खूप खर्च होतो. कधी फोटो डाऊनलोड करण्यासाठी तर कधी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हॉट्सॲपला प्रचंड इंटरनेट डेटाची गरज असते. पण आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मोबाइल डेटा वाचतो. (फोटो सौजन्य – pinterest)
कॉलिंग आणि चॅटिंगसोबतच आज लोक फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठीही या ॲपचा वापर करतात. एंड-टू-एंड एनक्रिप्शनमुळे, व्हॉट्सॲप एक अतिशय विश्वासार्ह मॅसेजिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. व्हॉट्सॲपवर आपण आपल्या कुटूंबियांसोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत फोटो किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट शेअर करत असतो.
जेव्हा तुम्ही अधिक फोटो आणि डॉक्युमेंट शेअर कराल, तेव्हा तुमचा डेटा देखील अधिक वापरला जातो. पण आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगत आहोत ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल आणि डेटा देखील कमी वापरला जाईल. यासाठी तुम्हाला फक्त काही सेटिंग करावी लागणार आहे. व्हॉट्सॲपवर सेटिंग उपलब्ध आहे जी तुमच्या डेटाचा अतिवापर होऊ देत नाही.
VoNR 5G: Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी, कंपनीने सुरु केली नवीन सर्विस! Airtel-Vi पुन्हा राहिले मागे