VoNR 5G: Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी, कंपनीने सुरु केली नवीन सर्विस! Airtel-Vi पुन्हा राहिले मागे
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी आतापर्यंत अनेक नवीन सर्विस सुरु केल्या आहेत. या नवीन आणि अपडेटेड सोयी सुविधांमुळेे युजर्सना प्रचंड फायदा होत आहे. आता कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी आणखी एक सर्विस सुरु करत आहे.
रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी VoNR सेवा घेऊन येणार आहे. VoNR म्हणजेच व्हॉईस ओव्हर न्यू रेडिओ. VoNR हे एक कॉलिंग तंत्रज्ञान आहे. VoNR सेवा सुरु करणारी जिओ ही पहिली कंपनी ठरणार आहे. हे तंत्रज्ञान बॅकग्राऊंड आवाज कमी करून आणि HD ऑडिओ वितरीत करतो. ज्यामुळे कॉलवर बोलताना युजर्सन स्पष्ट आवाज ऐकू येतो. या नवीन सर्विसमुळे आवाज गुणवत्ता सुधारते. यामध्ये कमी लेटेंसी आहे, ज्यामुळे कम्युनिकेशन अधिक चांगले होते. यासह, हे नेटवर्क एफिशिएंसी देखील सुधारते. (फोटो सौजन्य – pinterest)
आतापर्यंत Airtel, Vodafone Idea आणि Jio इत्यादी कॉलिंग फीचर म्हणून VoLTE चा वापर करत आले आहेत. हे तंत्रज्ञान 4G नेटवर्कमध्ये वापरले जाते, तर VoNR हे 5G नेटवर्कचे तंत्रज्ञान आहे. VoNR 5G नेटवर्क वापरून चांगली वॉइस क्वालिटी, कमी लेटेंसी आणि चांगली नेटवर्क एफिशिएंसी प्रदान करते. VoNR विशेषत: 5G नेटवर्कवर वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. जिओच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे युजर्सना आता कॉलवर बोलताना अधिक चांगला आवाज ऐकू येणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओने दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा सुरू केली आहे. देशातील इतर काही भागातही याची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. लवकरच कंपनी देशभरातील युजर्ससाठी ही नवीन सेवा उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारे, पुन्हा एकदा जिओने एयरटेल आणि वोडाफोन आइडिया या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकत बाजी मारली आहे. Airtel आणि Vodafone Idea (Vi) कडून या तंत्रज्ञानाच्या उपयोजनाबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे VoNR हे 5G नेटवर्कचे तंत्रज्ञान वापरणारी जिओ ही पहिली कंपनी असल्याचं मानलं जात आहे.
Airtel ने अद्याप 5G SA (स्टँडअलोन) डिप्लॉय केलेले नाही. या वर्षी देखील कंपनीकडून त्याच्या डिप्लॉयमेंटबद्दल कोणतीही माहिती नाही. अशा परिस्थितीत, एअरटेल ग्राहकांना VoNR साठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. Airtel प्रमाणे, Vi देखील 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) डिप्लॉय करेल. अशा परिस्थितीत ही कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांना VoNR सुविधा देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांकडे या सेवेसाठी फक्त जिओचा पर्याय उरला आहे. जिओने सुरु केलेल्या या नवीन सर्विसमुळे इतर युजर्स देखील कंपनीकडे आकर्षित होण्याची शक्यात आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जिओ युजर्सच्या संख्येत होण्याची शक्यता आहे.