Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एलन मस्कच्या स्टारलिंकची भारतात जोरदार चर्चा! काय आहेत सबस्क्रिप्शन प्लॅन्स? जाणून घ्या

स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिटमध्ये हजारो लहान सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सेवा प्रदान करते. ते सॅटेलाईटमधील कम्युनिकेशनसाठी लेझर वापरते. पण स्टारलिंकची सेवा तुमच्या परिसरात उपलब्ध नसेल तर तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 23, 2024 | 09:54 AM
एलन मस्कच्या स्टारलिंकची भारतात जोरदार चर्चा! काय आहेत सबस्क्रिप्शन प्लॅन्स? जाणून घ्या

एलन मस्कच्या स्टारलिंकची भारतात जोरदार चर्चा! काय आहेत सबस्क्रिप्शन प्लॅन्स? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतात गेल्या अनेक दिवसांपासून एलन मस्कच्या सॅटलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकबाबत चर्चा सुरु आहे. देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआयने स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुकेश अंबानी यांनी ट्राय आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडून स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला प्रचंड विरोध करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये स्टारलिंक नक्की आहे तरी काय, कशा प्रकारे कार्य करते, याबाबत अनेकांना शंका होती. तुम्हाला देखील स्टारलिंकबाबत काही शंका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

स्टारलिंकबद्दल जाणून घेऊया

स्टारलिंक ही एलन मस्कने लाँच केलेली आणि त्याच्या मालकीची सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे. स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिटमध्ये हजारो लहान सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सेवा प्रदान करते. पारंपारिक ब्रॉडबँड सेवांच्या विपरीत, स्टारलिंक केबल्स किंवा काही मोठ्या उपग्रहांवर अवलंबून नाही. त्याऐवजी, ते उपग्रहांमधील कम्युनिकेशनसाठी लेझर वापरते, ग्राउंड स्टेशनवरील अवलंबित्व कमी करते आणि कमी विलंब आणि हाय स्पीड सुनिश्चित करते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी आणि वेग वाढवण्यासाठी SpaceX आपली सॅटेलाईट इंटरनेट सेवा 42,000 युनिट्सने वाढवण्याच्या तयारीत आहे.

स्टारलिंक सर्विसची सुरुवात कशी करावी?

मार्गदर्शनासाठी स्टारलिंक ॲप वापरा किंवा सर्विस इंस्टॉल करण्यासाठी प्रोफेशनल व्यक्तिला नियुक्त करा. पण, त्याआधी तुम्हाला ही सेवा तुमच्या परिसरात उपलब्ध आहे की नाही हे तपासावे लागेल. जर स्टारलिंकची ही सेवा तुमच्या परिसरात उपलब्ध नसेल तर तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही.

इतर सेवांपेक्षा स्टारलिंक का वेगळे?

स्टारलिंक दुर्गम भागात सेवा देण्याच्या क्षमतेमुळे वेगळे आहे. विशेषतः जेथे पारंपारिक इंटरनेट उपलब्ध नाही किंवा स्लो आहे, अशा ठिकाणी स्टारलिंकची इंटरनेट सेवा अगदी सहज वापरली जाऊ शकते. मात्र, स्टारलिंक फायबर-ऑप्टिक स्पीडशी जुळू शकत नाही. परंतु स्टारलिंक सॅटेलाइट कव्हरेज आणि लोकेशनवर अवलंबून काही भागात 150 Mbps ते 264Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड ऑफर करते.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्टारलिंक इंटरनेट सर्विस विशेषत: अशा लोकांसाठी फायद्याची आहे, जे पारंपारिक इंटरनेट नसलेल्या भागात (गावे, दुर्गम ठिकाणे, जंगले, विरळ लोकवस्तीचे वाळवंट क्षेत्र) राहतात. हे दुर्गम कामगार, प्रवासी आणि ट्रेकर्ससाठी गेम चेंजर सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.

सब्सक्रिप्शन बेनिफिट्स आणि उपलब्धता

  • स्टारलिंक कोणत्याही दीर्घकालीन करारांशिवाय अनमॅच्ड फ्लेक्सिबिलिटी ऑफर करण्याचा दावा करते.
  • जे स्टारलिंकच्या सब्सक्रिप्शन ऑफरचा लाभ घेत आहेत, ते आवश्यकतेनुसार प्लॅन्स थांबवू शकतात. किंवा दुसऱ्या प्लॅनमध्ये स्विच करू शकतात.
  • याव्यतिरिक्त, स्टारलिंक 30-दिवसांची फ्री ट्रायल आणि फुल रिफंड पॉलिसी रिस्क-फ्री एक्सपीरिएंस सुनिश्चित करते.
  • स्टारलिंक सध्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये कार्यरत आहे.
  • भारतात, नियामक मंजुरी प्रलंबित आहेत. पण सॅटेलाइट कम्युनिकेशन स्पेक्ट्रम वाटपासाठी चर्चा सुरू आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे भविष्य

स्टारलिंकचे क्रांतिकारी सॅटेलाइट इंटरनेट जगातील सर्वात दुर्गम भागांपर्यंत कनेक्टिव्हिटी आणत आहे, पारंपारिक प्रोवाइडर्सना आव्हान देत आहे.

Web Title: Tech updates what are the subscription plans for elon musk satellite internet service starlink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service

संबंधित बातम्या

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस
1

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
2

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.