Elon Musk च्या स्टारलिंक एंट्रीने मुकेश अंबानी नाराज, सरकारकडे केली ही मागणी
एलोन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणि मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये वाद सुरूच आहे. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीने भारतातील टेलिकॉम कंपन्याचं टेन्शन वाढलं आहे. स्टारलिंक भारतात सॅटेलाइट इंटरनेट देण्यासाठी आपली सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे, परंतु भारतीय दूरसंचार कंपन्या याला विरोध करत आहेत. विशेषत: जिओ याला उघडपणे विरोध करत आहे. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीवर मुकेश अंबानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्टारलिंकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जिओने टेलिकॉम रेग्युलेटर ट्राय यांना सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम वाटप करण्यापूर्वी स्टारलिंक आणि कुइपरचे पुनरावलोकन करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत स्टारलिंक आणि कुईपर भारतात येण्याची चिंता मुकेश अंबानींना का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीने मुकेश अंबानी यांच्या चिंतेंत का वाढ होत आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी ट्राय आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. विदेशी कंपन्या भारतात आल्याने देशांतर्गत टेलिकॉम कंपन्यांना तोटा सहन करावा लागू शकतो, असे रिलायन्सचे मत आहे. याच कारणामुळे मुकेश अंबानी स्टारलिंकच्या एंट्री बाबत नाराज आहेत.
वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमच्या वाटपावर आक्षेप घेतला आहे. स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाद्वारेच केले जावे, असे त्यांचे आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांचे मत आहे. तर स्टारलिंकचे सीईओ एलोन मस्क यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे आता कोणाची मागणी पूर्ण होणार आणि सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमचे वाटप कसे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रममध्ये वैयक्तिक किंवा घरगुती वापरकर्त्यांसाठी तरतूद समाविष्ट नाही. रिलायन्सने म्हटले आहे की, लिलाव प्रक्रियेमुळे देशांतर्गत दूरसंचार ऑपरेटर्सना आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल, जो उद्योगाच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय असेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने केले जाईल. यासाठी कोणताही लिलाव होणार नाही. मात्र, ते मोफत मिळणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच्या रिपोर्टनुसार, स्टारलिंकने सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित भारताच्या अटी मान्य केल्या आहेत. यामुळे आता स्टारलिंक भारतात येण्याची शक्यता वाढली आहे. मात्र जिओ आणि एअरटेल स्टारलिंकला भारतात येण्यास कडाडून विरोध करत आहेत.
यासाठी त्यांनी ट्रायकडे विनंतीही केली आहे. स्टारलिंक किंवा ॲमेझॉन क्विपर सेवा भारतात सुरू झाल्यास ती थेट जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करेल. सध्या जिओकडे सर्वात जास्त यूजरबेस आहे. यानंतर एअरटेलचा क्रमांक येतो. स्टारलिंकच्या आगमनाने या दोन्ही खासगी कंपन्यांना अडचण निर्माण होणार आहे.
स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता स्टारलिंकचा भारतातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या (DoT) “डेटा लोकलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या” कराराचे पालन करत डेटा लोकॅलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत.