
धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण
जगभरात मालवेयर आणि मोबाईल्स अटॅक्सचा धोका वाढला आहे. मोबाईल अटॅकच्या सर्वाधिक घटना भारतात घडल्या आहेत. एका ताज्या अहवालानुसार, जगभरातील 26 टक्के मोबाईल अटॅक्स केवळ भारतात होतात. IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) वर होणाऱ्या सायबर अटॅक्सबद्दल बोलायचं झालं तर या घटनांमध्ये अमेरिका टॉपवर आहे आणि जगभरातील अर्ध्याहून अधिक सायबर अटॅक्स याच ठिकाणी घडतात. रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, जगभरात मालवेयर आणि स्पायवेयरद्वारे मोबाईल अटॅकच्या घटनांमध्ये 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Zscaler च्या ThreatLabz 2025 Mobile, IoT, and OT Threat रिपोर्टनुसार, भारतात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोबाईल अटॅकच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भारत एक असा देश बनला आहे, जिथे जगभरातील सर्वात जास्त मोबाईल अटॅक्स होतात. सायबर गुन्हेगार आता कार्डऐवजी मोबाइल पेमेंटद्वारे जास्त फ्रॉड करत आहेत. रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, सायबर अटॅकर्स एनर्जी सेक्टरला सर्वात जास्त लक्ष्य बनवत आहेत. या सेक्टरवर गेल्या वर्षीच्या तुलनेत होणाऱ्या सायबर अटॅकच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रांसपोर्टेशन सेक्टरमध्ये होणारे सायबर अटॅक देखील वेगाने वाढत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गूगल प्ले स्टोरवर 200 हून अधिक मलेशियस अॅप्स आढळले आहेत, ज्यांना 4.2 करोडपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड केले होते. उत्पादकता आणि वर्कफ्लो युटिलिटी अॅप्स म्हणून स्वतःचे मार्केटिंग करणारे हे अॅप्स टूल्स श्रेणीमध्ये सूचीबद्ध होते. या अॅप्सला जगभरात करोडोवेळा डाऊनलोड करण्यात आले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुगलने प्ले स्टोअरवर बनावट अॅप्स सूचीबद्ध होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले असूनही, सायबर गुन्हेगार त्यांना सूचीबद्ध करण्यात यशस्वी होतात. हे अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यासाठी आणि मालवेअर किंवा रॅन्समवेअर इंस्टॉल करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
CERT-In ने देशातील करोडो अँड्रॉईड युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. भारत सरकारच्या सायबर सुरक्षा टीम (CERT-In) ने अँड्रॉइड यूजर्ससाठी एका मोठ्या सायबर अटॅकच्या धोक्याबद्दल सांगितलं आहे. अँड्रॉइड फोनमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्सना हल्ला करण्याची संधी मिळू शकते. अलीकडेच जारी केलेल्या या एडवाइजरीमध्ये, सरकारी एजन्सीने म्हटले आहे की हॅकर्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममधील या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात आणि लोकांची मोठी फसवणूक करू शकतात.
Ans: हॅकर्स तुमचा डेटा लॉक करतात आणि परत मिळवण्यासाठी खंडणी (रॅन्सम) मागतात.
Ans: नेहमी strong password वापरा. 2-factor authentication सुरू ठेवा. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. सॉफ्टवेअर आणि अॅप्स नियमित अपडेट करा.
Ans: Computer Emergency Response Team – India ही भारत सरकारची अधिकृत संस्था आहे जी सायबर सुरक्षेसाठी जबाबदार आहे.