Airtel-Vi ची उडाली झोप! Jio आणि BSNL ची जोडी टेलिकॉम कंपन्यांवर पडणार भारी, या 2 राज्यात आता नाही भासणार नेटवर्कची कमी
देशातील आघाडीची खाजगी टेलिकॉम कंपनी म्हणजेच जिओ आणि देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी हातमिळवणी केली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे आता इतर टेलिकॉम कंपन्यांची झोप उडाली आहे. जिओ त्यांच्या युजर्सना एका रिचार्ज प्लॅन बरेच फायदे ऑफर करते, तर बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी असतात. आता या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याचं मानलं जात आहे.
जिओने बीएसएनएलसोबत पार्टनरशिप करत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन नवीन इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. बीएसएनएल या दोन्ही राज्यात आधीपासूनच नेटवर्क ऑपरेट करत आहे. या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि त्यामध्ये युजर्सना कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील दुर्गम भागात जिथे जिओचे कव्हरेज मर्यादित आहे, तिथे बीएसएनएल नेटवर्कचा वापर करणाऱ्या जिओ यूजर्सनाही याचा फायदा होईल. बीएसएनएल आईसीआर सर्विस जियोच्या लाँच करण्यात आलेल्या काही निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध आहे. जिओने सांगितलं आहे की, या भागिदारीमुळे ग्राहक एकाच भौगोलिक वर्तुळात बीएसएनएल नेटवर्कशी कनेक्ट होऊन निवडक ठिकाणी व्हॉइस, डेटा आणि एसएमएस सेवांचा लाभ घेऊ शकतात.
कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 196 रुपये आणि 396 रुपये ठेवण्यात आली आहे आणि या दोन्ही प्लॅन्सची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. 196 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 2 जीबी डेटासह 1000 मिनिटे व्हॉईस कॉल आणि 1000 एसएमएस दिले जातात. तर 396 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 1000 मिनिटे व्हॉईस कॉल आणि 1000 एसएमएसचे फायदे मिळणार आहेत.
जिओने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही प्लॅन्स बीएसएनएलच्या आईसीआर नेटवर्कचा वापर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि हे जिओ नेटवर्क किंवा इतर कोणत्याही नेटवर्क (जसे की एअरटेल किंवा व्हीआय) अंतर्गत ऑपरेट करण्याची परवानगी नाही. केवळ तेच ग्राहक या प्लॅनचा वापर करू शकणार आहे, ज्यांनी बीएसएनएल नेटवर्कवर आईसीआर पॅक अॅक्टिव्ह ठेवला आहे.
नियम आणि अटींनुसार, हे आईसीआर रिचार्ज तेव्हाच काम करणार आहेत, जेव्हा डिव्हाईस बीएसएनएल नेटवर्कसोबत जोडलेले असतील. हे प्लॅन सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सर्कलच्या जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे, ज्यांचे उद्दिष्ट मर्यादित जिओ नेटवर्क उपलब्धता असलेल्या भागात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे.
Ans: काही फाइबर आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये Disney+ Hotstar, Sony LIV, आणि Zee5चे सबस्क्रिप्शन दिले जाते.
Ans: PORT <आपला मोबाइल नंबर> असा SMS 1900 वर पाठवा. UPC कोड मिळाल्यावर नवीन नेटवर्ककडे जा.
Ans: हे BSNL चे FTTH (Fiber-to-the-Home) ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे, ज्यात 30 Mbps ते 300 Mbps पर्यंत स्पीड मिळतो.






