
मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा... आजच खरेदी करा या अॅक्सेसरीज
तुम्हाला देखील मोबाईल गेमिंग आवडते का? तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनवर सतत वेगवेगळे गेम खेळत असता का? मोबाईल गेमिंगवेळी स्क्रिनवर फक्त टॅप करून किंवा स्वाईप करून काहीही होणार नाही. कारण तुम्हाला जर तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही गेमिंग अॅक्सेसरीजचा वापर करू शकता. हल्ली बाजारात हाय रिफ्रेश रेट आणि पावरफुल चिपवाले मोबाइल उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनवर गेम खेळण्याची मजा काही वेगळीच आहे. ही मजा आणखी वाढवण्यासाठी तुम्ही गेमिंग अॅक्सेसरीजचा वापर करू शकता. ज्यामुळे गेममध्ये शूटिंग असो किंवा स्वाईप करणं सर्वकाही मजेदार होणार आहे.
जर तुम्ही फिजिकल कंट्रोलर असाल तर तुम्हाला गेमिंगमध्ये आणखी चांगला कंट्रोल मिळणार आहे. बाजारात हल्ली असे अनेक कंट्रोलर उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एनालॉग स्टिक्स, शोल्डर बटन आणि एर्गोनॉमिक ग्रिप्स मिळतात. यामुळे दिर्घकळ चालणाऱ्या गेमिंग सेशनमध्ये देखील थकवा जाणवत नाही. यासाठी तुम्ही स्मार्टफोन सपोर्टवाला कंट्रोलर किंवा फोनसोबत अटॅच होणारा गेमपॅड खरेदी करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला कंट्रोलर किंवा गेमपॅड खेरदी करण्याची इच्छा नसेल आणि तुमच्यासाठी मोबाईलवर गेमिंग करणं योग्य आहे. तर अशावेळी तुम्ही फिंगर स्लीव्स खरेदी करण्याचा विचार करू शकता. हे स्लीव्ज कंडक्टिव फॅब्रिकपासून तयार केले जातात. ज्यामुळे टच सेंसेटिविटी वाढवण्यासाठी मदत होते. यासोबतच यामध्ये घाम येत नाही, ज्यामुळे फिंगर स्मूद पद्धतीने स्क्रीनवर स्लाइड होते. हा गेमिंग कंट्रोलरचा एक हलका, स्वस्त आणि अत्यंत प्रभावी पर्याय आहे.
गेमिंग दरम्यान फोन गरम होणं अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र जर फोन सतत ओवरहीट होत राहिला तर गेमिंग एक्सपीरियंस खराब होऊ शकतो. यामुळे फ्रेम रेट कमी होतो आणि गेम सतत अडकतो. अशा परिस्थितीत कूलिंग अटॅचमेंट फायदेशीर ठरते. गेमिंग करताना फोन जास्त गरम होऊ नये म्हणून, तुम्ही क्लिप-ऑन फॅन, कूलिंग ग्रिप किंवा बिल्ट-इन व्हेंटिलेशन असलेले मोबाइल गेमिंग डॉक खरेदी करू शकता.
गेमिंग करताना ध्वनी हा सहसा जास्त लक्ष केंद्रित करत नाही, परंतु एक चांगला गेमिंग हेडसेट किंवा इअरफोन एक तल्लीन करणारा अनुभव देऊ शकतात. यासाठी तुम्ही वायर्ड किंवा ब्लूटूथ हेडफोन खरेदी करू शकता.
Ans: Free Fire MAX, BGMI (Battlegrounds Mobile India), Call of Duty: Mobile, Genshin Impact आणि PUBG New State हे सध्या भारतातील टॉप गेम्स आहेत.
Ans: किमान 6GB RAM, 128GB स्टोरेज, आणि Snapdragon 7 Series किंवा त्याहून उच्च प्रोसेसर असलेला स्मार्टफोन गेमिंगसाठी योग्य ठरतो.
Ans: Asus ROG Phone, iQOO 13, OnePlus 13, Poco F6, आणि iPhone 15 Pro हे गेमिंगसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत.