Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
टेक दिग्गज एलन मस्क यांनी त्यांचे स्वत:चे आर्टिफिशियल इंटेलिजेंस-आधारित ऑनलाइन एनसाइक्लोपीडिया Grokipedia लाँच केले आहे. Wikipedia ला टक्कर देण्यासाठी एलन मस्कने Grokipedia लाँच करण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी देखील या दोन्ही प्लॅटफॉर्म्समध्ये बराच फरक आहे. मस्क बऱ्याच काळापासून Wikipedia वर वेगवेगळे आरोप आणि टिका करत आहेत. त्यामुळेच Wikipedia ला मागे टाकण्यासाठी मस्कने Grokipedia लाँच केले. सध्या Grokipedia v0.1 वर्जन ऑनलाइन फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तथापी, Grokipedia मध्ये विकिपीडियाच्या तुलनेत कमी लेख उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये बराच फरक आहे. हाच फरक आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Wikipedia हे असे प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील लाखो ह्यूमन वॉलंटियर्सद्वारे चालवले जाते. जे या प्लॅटफॉर्मवर लेख लिहीतात, एडीट करतात आणि त्यांची अचूकता तपासतात. याच कारणामुळे हे जगातील सर्वात मोठे ऑनलाइन नॉलेज प्लॅटफॉर्म मानले जाते. या 12.3 करोडहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर, Grokipedia हे पूर्णपणे AI वर आधारित आहे. हे प्लॅटफॉर्म एलन मस्कची कंपनी xAI ने तयार केले आणि यामध्ये तेच AI चॅटबॉट Grok काम करते. हे चॅटबोट माहिती तयार करण्यासाठी आणि फॅक्ट चेक करण्यासाठी वापरले जाते. या वेबसाईटनुसार, Grokipedia काही माहिती Wikipedia कडून Creative Commons License अंतर्गत घेते. (फोटो सौजन्य – Pinterest)
Wikipedia मध्ये कोणताही युजर कोणतेही पेज एडीट करू शकते. मात्र काही खास पेज नवीन युजर्ससाठी लॉक ठेवले जातात, ज्यामुळे चुकीची माहिती आणि स्पॅम रोखण्यासाठी मदत होणार आहे. एडीट करण्यात आलेला कंटेट एडिटर्स आणि ऑटोमेटेड सिस्टम्सद्वारे व्हेरिफाय केला जातो. मात्र Grokipedia मध्ये थेट एडीट करणं शक्य नाही. यूजर्स केवळ फीडबॅक फॉर्मद्वारे एडिट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात. जर तुमची ही विनंती मंजूर करण्यात आली तरच बललेला कंटेट वेबसाईटच्या See Edits टॅबमध्ये पाहायला मिळणार आहे.
Wikipedia वर सध्या 209 मिलियनहून अधिक पेज उपलब्ध आहेत, तर Grokipedia सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. Grokipedia वर सध्या 8.8 लाख पेज उपलब्ध आहेत. एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, येणाऱ्या v1 वर्जनमध्ये प्लॅटफॉर्मची क्षमता आणि कंटेटमध्ये अधिक सुधारणा केली जाणार आहे.
भाषेच्या बाबतीत Wikipedia खूप पुढे आहे. हे प्लॅटफॉर्म 343 भाषांमध्ये उपलब्ध आहे, तर Grokipedia सध्या केवळ 47 भाषांमध्ये युजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनी भविष्यात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आणखी भाषा जोडू शकते, ज्यामुळे युजर्सच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
Wikipedia हे विकिमीडिया फाउंडेशन नावाच्या एका ना-नफा संस्थेद्वारे चालवले जाते. ते त्याच्या कामकाजासाठी पूर्णपणे देणग्या आणि अनुदानांवर अवलंबून असते. तर Grokipedia एलन मस्कची कंपनी xAI चा भाग आहे, ज्याला 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे एक फॉर-प्रॉफिट म्हणजेच नफा कमावणारी कंपनी आहे. जे त्याच्या AI उत्पादनांमधून उत्पन्न मिळवते.
Grokipedia सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र एलन मस्कच्या भविष्यातील विजननुसार हे एक AI-संचालित ज्ञानाचे भविष्य बनू शकते. जर Grokipedia ला Wikipedia प्रमाणे विश्वास मिळवण्यात यश आले, तर येत्या काळात इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलणार आहे.
Ans: Wikipedia ही एक मोफत, ओपन-सोर्स ऑनलाइन ज्ञानकोश (encyclopedia) आहे, जिथे जगभरातील लोक एकत्रितपणे माहिती लिहितात आणि संपादित करतात.
Ans: Wikipedia ची स्थापना Jimmy Wales आणि Larry Sanger यांनी 15 जानेवारी 2001 रोजी केली.
Ans: Wikipedia 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.






