Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Tecno Pova 8 Pro 5G Tonino Lamborghini Limited Edition Launched: टेक्नो एका नवीन स्मार्टफोनसह एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने टोनिनो लॅम्बोर्गिनीसोबत कोलॅबोरेशन करत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा लूक अतिशय आकर्षक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2026 | 09:28 AM
Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Follow Us
Follow Us:
  • लॅम्बोर्गिनीचा तडका: टेक्नो पोव्हा 8 प्रो 5जी टोनिनो लॅम्बोर्गिनी लिमिटेड एडिशनमध्ये ब्लॅक-रेड कलर, हेक्सागोन पॅटर्न, पल्स लाइन आणि खास लॅम्बोर्गिनी लोगो देण्यात आला आहे.
  • दमदार स्पेसिफिकेशन्स: फोनमध्ये 6.78-इंच 144Hz अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7400-अल्टिमेट 5G चिपसेट, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.
  • किंमत अद्याप गुलदस्त्यात: या स्पेशल एडिशनची किंमत आणि विक्रीची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही; भारतात मूळ पोव्हा 8 प्रो 5G ची किंमत ₹49,999 आहे.
Tecno Smartphone Launched: स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका झाला आहे. टेक्नो आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी यांनी एक स्पेशल स्मार्टफोन एडीशन लाँच करण्यासाठी कोलॅबोरेशन केलं आहे. याअंतर्गत Tecno Pova 8 Pro 5G Tonino Lamborghini Limited Edition लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये टोनिनो लॅम्बोर्गिनीची सिग्नेचर डिझाईन लँग्वेज पाहायला मिळत आहे. तसेच या स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर पल्स लाईन आणि टोनिनो लॅम्बोर्गिनीचा खास लोगो पाहायला मिळत आहे. या नव्या स्मार्टफोनने यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क

किती असणार स्मार्टफोनच्या स्पेशल एडीशनची किंमत?

कंपनीने अद्याप टेक्नो पोव्हा 8 प्रो 5जी टोनिनो लॅम्बोर्गिनी लिमिटेड एडिशनची किंमत जाहिर केली नाही. तसेच या डिव्हाईसची विक्री कधी सुरु होणार आहे, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. हार्डवेयरच्या बाबतीत हा स्मार्टफोन भारतात गेल्या महिन्यात 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या पोव्हा 8 प्रो 5जी सारखाच आहे. (फोटो सौजन्य: Tecno)

स्मार्टफोनमध्ये काय आहे खास?

टेक कंपनी टेक्नोने हा लिमिटेड एडीशन स्मार्टफोन इटॅलियन लाइफस्टाइल ब्रँड टोनिनो लॅम्बोर्गिनीसोबत मिळून तयार केला आहे. हा स्मार्टफोन टोनिनो लॅम्बोर्गिनी ब्लॅक शेडमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या टोनसह हेक्सागोन पॅटर्न देखील पाहायला मिळत आहे. रिअर पॅनलच्या मध्यभागी एक पल्स लाइन आणि लाइट रिफ्लेक्ट करण्यासाठी इंटरनल मिरर स्ट्रक्चर देण्यात आले आहे. बॅक पॅनलवर प्रीमियम मेटॅलिक फिनिशमध्ये टोनिनो लॅम्बोर्गिनीचा लोगो पाहायला मिळत आहे, तर या डिव्हाईसच्या अलाईव्ह मॅट्रिक्स डिस्प्लेवर एक कस्टमाइज्ड ‘L’ सिग्नेचर आहे.

टेक्नो पोव्हा 8 प्रो 5जी टोनिनो लॅम्बोर्गिनी लिमिटेड एडिशनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित HiOS 16 वर चालतो. या स्मार्टफोनला 2 मोठ्या अँड्रॉईड ओएस अपग्रेड्ससह 3 वर्षांचे सुरक्षा पॅच मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच का (2,644×1,208 पिक्सेल) हायपरलक्स ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 429ppi पिक्सेल डेंसिटीला सपोर्ट करतो. स्क्रीनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 93.18 टक्के आहे आणि हे 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. डिस्प्लेच्या मजबूतीसाठी यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i का प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

प्रोसेसर

कंपनीने लाँच केलेल्या या स्पेशल एडीशन स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट 5G चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला आर्म माली-जी615 एमसी2 जीपीयूसोबत जोडण्यात आला आहे. यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा यूनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट आणि सोनी एलवायटी-700C सेंसर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा समाविष्ट आहे. रिअर कॅमेरा आयलँडवर कस्टमाइजेशन ऑप्शन्सवाला अलाईव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

आठ महिन्यांनंतर इस्रोची मोठी झेप! ‘नॉटी बॉय’चे दमदार कमबॅक; आकाशातून भारताचा पहारा होणार आणखी मजबूत

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ग्लोनास, बेईडू, गॅलीलियो, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे ऑप्शन्स देण्यात आले आहे. सेंसर्सच्या यादीमध्ये एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जी-सेंसर, ई-कंपास, इन्फ्रारेड (IR) रिमोट कंट्रोल आणि जायरोस्कोप यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

बॅटरी

टेक्नो पोव्हा 8 प्रो 5जी टोनिनो लॅम्बोर्गिनी लिमिटेड एडिशनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Tecno pova 8 pro 5g tonino lamborghini limited edition launched design and features are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?
1

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
2

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?
3

फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर
4

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.