Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?

WhatsApp Upcoming Feature: लवकरच एक नवीन व्हॉट्सॲप फीचर रिलीज केले जाणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेला कॉल उचलण्याआधीच कॉलिंगचे कारण समजणार आहे. कसं? आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 21, 2026 | 12:05 PM
फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?

फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर
  • अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना व्हॉट्सॲप स्वत: विचारेल कारण
  • कंपनीने या फीचरची रिलीज डेट देखील अद्याप घोषित केली नाही
WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप नेहमीच त्यांच्या करोडो यूजर्सच्या प्रायव्हसी आणि कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी, नवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असतो. आता देखील कंपनी एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे फीचर लवकरच रोलआऊट केलं जाण्याची शक्यता आहे. काही काळापूर्वी कंपनीने सायलेंट अननोन कॉलर्ससारखे फीचर सादर केले होते. आता कंपनी हे फीचर अधिक अपग्रेड करण्याचा विचार करत आहे. नव्या फीचरमध्ये अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना व्हॉट्सॲप स्वत: आधी कारण विचारेल की फोन का केला जात आहे.

Jio Recharge Plan: 28 नाही, 30 नाही तर थेट 36 दिवसांची व्हॅलिडीटी! जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, जाणून घ्या

यूजर्स, यानंतर ट्रांसक्रिप्ट देखील वाचू शकणार आहेत आणि निर्णय घेऊ शकतील की कॉल रिसीव्ह करणं गरजेचं आहे की नाही. अलीकडेच समोर आलेल्या काही रिपोर्ट्नुसार, हे फीचर सध्या अँड्रॉईड ॲपमध्ये डेव्हलप केले जात आहे. आगामी फीचर व्हॉट्सॲपच्या कॉल फिल्टरिंग सिस्टिमचा एक भाग बनू शकते. अद्याप हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध करण्यात आले नाही. तसेच कंपनीने या फीचरची रिलीज डेट देखील अद्याप घोषित केली नाही. (फोटो सौजन्य: Pinterest) 

कॉल फिल्टरिंगसाठी मिळणार तीन पर्याय

समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये कॉल फिल्टरिंग मेन्यू एका नव्या पर्यायासह बदलला जाऊ शकतो. यामध्ये यूजर्सना तीन पर्याय मिळू शकतात. ज्यामध्ये नेव्हर, सायलेंस आणि आस्क फॉर कॉलिंग असे तीन पर्याय असणार आहेत.

पहिला पर्याय ‘नेव्हर’

हा पर्याय निवडल्यानंतर कॉल फिल्टरिंग पूर्णपणे बंद राहणार आहे आणि सर्व कॉल्स सामान्य पद्धतीने येतील.

दुसरा पर्याय ‘सायलेंस’

हा पर्याय निवडल्यास अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची रिंगटोन बंद असणार आहे. मात्र कॉलचे डिटेल्स कॉल्स टॅब आणि नोटिफिकेशनमध्ये दिसणार आहे.

तिसरा पर्याय ‘आस्क फॉर कॉलिंग’

हा पर्याय निवडल्यानंतर व्हॉट्सॲप अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तिला कॉलिंगचं कारण विचारणार आहे. एकदा त्यांना प्रतिसाद मिळाल्यावर, यूजर तो कॉल स्वीकारायचा की नाकारायचा, हे ठरवू शकतील.

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

संभाषणाचे ट्रांसक्रिप्ट देखील मिळणार

इतकंच नाही या फीचरमध्ये कॉल करणाऱ्या उत्तराचे टेक्स्ट ट्रांसक्रिप्ट देखील दिसणार आहे. यामुळे यूजर्सना, फोन न उचलताच, आलेला कॉल एखाद्या महत्त्वाच्या विषयासाठी आहे की नाही, हे ठरवता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हॉट्सॲपचे नवीन फीचर काय आहे?

    Ans: व्हॉट्सॲप एका नवीन कॉल फिल्टरिंग फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास कॉल करणाऱ्या व्यक्तीला फोन करण्याचे कारण विचारले जाऊ शकते.

  • Que: व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरचा फायदा कोणाला होणार आहे?

    Ans: अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल येणाऱ्या आणि स्पॅम किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहू इच्छिणाऱ्या यूजर्सना या फीचरचा फायदा होऊ शकतो.

  • Que: व्हॉट्सॲपच्या कॉल फिल्टरिंग फीचरमध्ये किती पर्याय मिळणार आहेत?

    Ans: या फीचरमध्ये नेव्हर, सायलेंस आणि आस्क फॉर कॉलिंग असे तीन पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Whatsapp new feature app may ask unknown callers why they are calling hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 28 नाही, 30 नाही तर थेट 36 दिवसांची व्हॅलिडीटी! जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, जाणून घ्या
1

Jio Recharge Plan: 28 नाही, 30 नाही तर थेट 36 दिवसांची व्हॅलिडीटी! जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, जाणून घ्या

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स
4

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.