
'DNA सिद्ध करा आणि करोडोंची संपती मिळवा'... टेलीग्राम फाऊंडर Pavel Durov ने केली अजब घोषणा, सोशल मीडियावर खळबळ
41 वर्षीय रशियन वंशाच्या टेक उद्योजकाने जुलै 2024 मध्ये खुलासा केला की त्याने स्पर्म डोनेशनद्वारे किमान 12 देशांमध्ये 100 हून अधिक जैविक मुलांना जन्म दिला आहे. ड्यूरोवने 2010 च्या सुमारास स्पर्म डोनेट करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या मित्राला मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर त्यांनी मॉस्कोच्या अल्ट्राव्हिटा फर्टिलिटी क्लिनिकमध्ये निनावी डोनेशन देण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
अहवालानुसार, 2024 च्या उन्हाळ्यात क्लिनिकने एक असामान्य मार्केटिंग कँपेन सुरु केलं होतं. ज्यामध्ये ड्यूरोवच्या ‘बायोमटेरियल’ ला ‘हाय जेनेटिक कम्पॅटिबिलिटी’ असल्याचे आणि 37 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांसाठी मोफत आयव्हीएफ ऑफर करण्याचे आवाहन करण्यात आले. क्लिनिकमधील एका माजी डॉक्टरने WSJ ला सांगितले की, कायद्याच्या गुंतागुंतीपासून वाचण्यासाठी सहभागी होणाऱ्या महिला अविवाहीत असणे गरजेचे होते आणि सांगितलं की, सहभागी झालेल्या महिला शिकलेल्या आणि निरोगी होत्या. क्लिनिकच्या वेबसाईटवर ड्यूरोवच्या फोटोसोबत टेलीग्राम लोगोवाला एक बॅनर देखील होता, जो ‘खूप उच्च मागणी असलेले’ स्पर्म प्रमोट करत होता.
ड्यूरोवने एक फ्रेंच मॅगजीन इंटरव्यू दरम्यान घोषणा केली की, त्यांच्या सर्व बायोलॉजिकल मुलांना संपत्तीत समान हिस्सा मिळणार आहे. त्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये लेक्स फ्रिडमॅन पॉडकास्टवर सांगितलं की, जर ते माझ्यासोबत DNA सिद्ध करू शकतात, तर आजपासून 30 वर्षांनंतर म्हणजेच माझा मृत्यू झाल्यानंतर त्या मुलांना माझ्या संपत्तीत वाटा मिळवण्याचा अधिकार असणार आहे.
फोर्ब्सने त्यांची नेट वर्थ 17 बिलियन डॉलर असल्याचं सांगितलं आहे. यातील सर्वात मोठा भाग टेलिग्रामसंबंधित आहे. त्यांच्याकडे 2013 मध्ये खरेदी केलेल्या बिटकॉईनची एक अज्ञात रक्कम देखील आहे. ड्यूरोवने केलेल्या या घोषणेनंतर स्वत:ला त्यांचा मुलगा सांगणाऱ्या मेसेजची संख्या वाढली. त्यांनी सांगितलं की, की ते त्यांचे DNA ओपन-सोर्स करण्याची योजना आखत आहेत. ज्यामुळे बायोलॉजिकल मुलं एकमेकांना शोधू शकतील.
Ans: Telegram आणि VK (VKontakte) चे संस्थापक/CEO.
Ans: प्रायव्हसी-फोकस्ड अॅप बनवल्यामुळे.
Ans: Secret Chat, Channels, Bots, Groups व स्टिकर्स.