11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी... itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
टॅब्लेटमध्ये UNISOC T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. itel VistaTab 30 टॅब्लेटमध्ये 10W चार्जरसरह 7000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या या लेटेस्ट लाँच टॅब्लेटमध्ये सेलुलर आणि वाय-फाय ऑप्शन मिळणार आहे आणि हे डिव्हाईस Android 13 वर चालते. हे टॅब्लेट मल्टी-स्क्रीन कोलॅबोरेशन देखील सपोर्ट करते आणि यामध्ये ChatGPT द्वारे पावर्ड AI व्हॉईस असिस्टेंट Aivana चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये लर्निंग सेंटर आणि iPulse Kids Space अॅप्स देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
itel ने लाँच केलेल्या VistaTab 30 च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच डिव्हाईसची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होते. हे टॅब्लेट स्पेस ग्रे आणि स्काय ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सध्या, टॅबलेट खरेदी केल्यावर तुम्हाला 1,000 रुपयांचे लेदर बॅक कव्हर पूर्णपणे मोफत मिळेल.
itel VistaTab 30 टॅब्लेट बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. पण जर तुम्ही प्रिमियम ब्रँडचे टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल Samsung Galaxy Tab A11 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या टॅब्लेटमध्ये थोडा छोटा 8.7 इंच TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि Dolby-engineered ड्यूल स्पीकर्स देण्यात आले आहे. यासोबतच या टॅब्लेटमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आणि 8 GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज देखील आहे.
Ans: हो, भारतात itel सर्व रिटेल आणि ऑनलाइन स्टोअर्समध्ये मिळतात.
Ans: सामान्यतः बजेट सेगमेंटमध्ये (₹6,000–₹15,000) उपलब्ध.
Ans: मोठी बॅटरी, जलद चार्जिंग, कॅमेरा, फॅशन रंग व स्लिम डिझाइन.






