Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

The Android Show 2026: गुगलने आगामी इव्हेंटपूर्वी आयोजित केलेल्या अँड्रॉईड शोमध्ये अनेक फीचर्सची घोषणा केली आहे. अँड्रॉईड ते आयफोन फाईल शेअरिंग, जेमिनी एआय आणि नवीन अपडेट्समुळे यूजर्सचा अनुभव आणखी स्मार्ट होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 11:29 AM
The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • गुगल लवकरच अँड्रॉईडवरून आयफोनला क्विक शेअरद्वारे फाईल शेअरिंग सपोर्ट देणार आहे.
  • क्रोम आणि मोबाईल अ‍ॅपमध्ये जेमिनी एआय फीचर्समुळे वेबपेज समरी आणि स्मार्ट टास्क्स शक्य होणार आहेत.
  • अँड्रॉईड ऑटोमध्ये 3D गुगल मॅप्स, नवीन डिझाईन आणि फुल एचडी युट्यूब सपोर्ट मिळणार आहे.
The Android Show By Google: टेक कंपनी गुगल पुढील आठवड्यात एका ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. 19 आणि 20 मे रोजी कंपनीचा Google I/O ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. मात्र या ईव्हेंटपूर्वीच कंपनीने मंगळवारी ‘The Android Show: I/O Edition’ आयोजित केला होता. कंपनीने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये येणारे अपडेट्स आणि फीचर्स शेअर करण्यासाठी कंपनीने या वर्चुअल ईव्हेंटचे आयोजन केले होते. हा ईव्हेंट आगामी Google I/O ईव्हेंटचा एक भाग आहे. मंगळवारी झालेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने अँड्रॉईडसाठी रोलआऊट केल्या जाणाऱ्या काही फीचर्सचा खुलासा केला आहे.

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

क्विक शेअर एअरड्रॉप इंटरऑपरेबिलिटी सपोर्ट

आयोजित करण्यात आलेल्या अँड्रॉईड शोमध्ये करण्यात आलेल्या अनेक घोषणा गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या एडवांस डेवलपमेंट साइकलमुळे आधीच समोर आल्या होत्या. ज्या यूजर्सनी अद्याप बीटा वर्जन इंस्टॉल केले नाही, त्यांच्यासाठी हे सर्व फीचर्स नवीन होते. यापैकी एक अतिशय खास आणि आकर्षक फीचर्स म्हणजे क्विक शेअर एअरड्रॉप इंटरऑपरेबिलिटी सपोर्ट. या नव्या फीचरमुळे क्विक शेअर एअरड्रॉपशी सुसंगत होते. यामुळे यूजर्स अँड्रॉईड डिव्हाईसवरून आयफोनवर तात्काळ फाईल शेअर करू शकतात. हे फीचर गुगल पिक्सेल 10 सिरीजसह रोलआऊट केलं जाणार आहे. भविष्यात निवडक सॅमसंग, ओप्पो, वनप्लस, व्हिवो, शाओमी आणि ऑनर मॉडेल्सना या फीचरचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या यूजर्सकडे सुसंगत डिव्हाईस नाही, ते आता कोणत्याही अँड्रॉईड डिव्हाईसवर क्विक शेअरचा वापर करून क्यूआर कोड जनरेट करू शकणार आहेत. ज्यामुळे ते क्लाऊडद्वारे आयओएस डिव्हाईससोबत त्वरित फाईल शेअर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्ससाठी देखील हे टूल सादर केले जावे, यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

क्रोम ब्राऊझर जेमिनी फीचर्स

कंपनी पुढील महिन्यात क्रोमसाठी काही नवीन AI फीचर्स सादर करण्याचे प्लॅनिंग करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला क्रोम ब्राऊझरसाठी अनेक नवीन जेमिनी फीचर्स जारी करण्यात आले होते. हे फीचर्स आता मोबाईल अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट केले जात आहेत. जेमिनी 3.1 च्या मदतीने यूजर्स लवकरच चॅटबोटला वेबपेजेसबद्दल प्रश्न विचारू शकणार आहेत. मोठ्या आर्टिकल्सची समरी काढू शकणार आहे आणि ॲप न बदलता अवघड विषय सहजपणे समजू शकणार आहेत.

यामध्ये एजेंटिक क्षमता देखील आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये ईव्हेंट जोडू शकणार आहात, Keep मध्ये रेसिरी सेव्ह करू शकणार आहात आणि जिमेलमध्ये एखादी खास माहिती शोधू शकणार आहात. तर नॅनो बनानासह तुम्ही तुमच्या आवडीच्या ईमेज क्रिएट करू शकणार आहात. तसेच फोटो कस्टमाइज करू शकता. गूगल ऑटो ब्राऊझ सादर करण्याची देखील तयारी करत आहे, जे एक AI एजेंट आहे. हे AI एजेंट स्वत: वेबसाइट्सचा वापरू करून शॉपिंग, फॉर्म भरणं आणि बुकिंग सारखी अनेक काम करू शकणार आहे.

अँड्रॉईड ऑटोमध्ये नवीन फीचर्स

अँड्रॉईड ऑटोमध्ये देखील काही नवीन फीचर्स जोडण्याची तयारी केली जात आहे. गूगल डॅशबोर्डवर ‘एज-टू-एज’ गूगल मॅप्स आणि कारमध्ये ‘मटेरियल 3 एक्सप्रेसिव’ डिझाईन लँग्वेजसाठी सिस्टिम पुन्हा एकदा डिझाईन केली जात आहे. याचा अर्थ असा आहे की, गाडीच्या सिस्टिममध्ये चांगले फॉन्ट्स, स्मूद एनिमेशन आणि नवीन वॉलपेपर्स पाहायला मिळणार आहेत.

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

गुगल मॅप्समध्ये एक जबरदस्त 3D व्यू आणला जाणार आहे, बिल्डिंग्स, ओवरपास आणि खडबडीत रस्ते दाखवतो. ड्राईव्हिंग दरम्यान चालकाचा गोंधळ दूर करण्यासाठी हे फीचर स्वत: लेन, ट्रॅफिक लाइट आणि स्टॉप साइन्स हाइलाइट करणार आहे. तसेच अँड्रॉईड ऑटोमध्ये यूट्यूब व्हिडीओसाठी देखील काही नवीन फीचर्स जोडण्याची योजना आखली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस वापरकर्त्यांना पार्क केलेल्या वाहनांमध्ये 60fps फुल-एचडी व्हिडिओ पाहता येणार आहे. बीएमडब्ल्यू, फोर्ड, जेनेसिस, ह्युंदाई, किया, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, रेनॉल्ट, स्कोडा, टाटा आणि व्होल्वो यांसारखे ब्रँड्स त्यांच्या गाड्यांमध्ये हे समर्थन आणतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google चा Google I/O इव्हेंट कधी होणार आहे?

    Ans: Google I/O 2026 इव्हेंट 19 आणि 20 मे रोजी आयोजित केला जाणार आहे.

  • Que: Android ते iPhone फाईल शेअरिंगसाठी कोणते फीचर आणले जाणार आहे?

    Ans: Google Quick Share ला AirDrop इंटरऑपरेबिलिटी सपोर्ट देणार आहे.

  • Que: Gemini AI मुळे यूजर्सना काय फायदे मिळतील?

    Ans: Gemini AI मुळे वेबपेज समरी, स्मार्ट सर्च आणि AI आधारित टास्क्स सहज करता येतील.

Web Title: The android show 2026 google unveils new ai file sharing and android auto features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Android
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स
1

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स
2

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
3

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
4

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.