Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स
टॉप अप करताना नेहमी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा वापर करा. गुगल प्ले स्टोअर, एप्पल ऍप स्टोअर आणि गेमचे अधिकृत टॉप अप पार्टनर सर्वात सुरक्षित मानले जातात. तसेच अनोळखी वेबसाइट किंवा सोशल मीडियावरील लिंक्सवर विश्वास ठेवणं अत्यंत धोकादायक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्स सहसा प्लेअर्सना अर्ध्या किंमतीत डायमंड्स किंवा अनलिमिटेड डायमंड्सची लालच देतात. या ऑफर्सना प्लेअर्स भुलतात ज्यामुळे त्यांचं अकाउंट धोक्यात येऊ शकतं. अशा ऑफर्सवर विश्वास ठेवून टॉप अप केल्यास तुमचं अकाउंट बॅन होण्याचा धोका असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की एखादी ऑफर गरजेपेक्षा जास्त आकर्षक वाटत असेल तर हा स्कॅम असू शकतो.
नेहमी लक्षात ठेवा की तुमचे लॉगिन डिटेल्स कोणासोबत शेअर करू नका. स्कॅमर्स टॉप अपच्या नावाखाली तुमच्याकडून अकाउंट लॉगिन डिटेल्सची मागणी करतात. अकाउंटचा पासवर्ड किंवा ओटीपी कोणासोबत शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे अकाउंट हॅक होऊ शकते.
व्यवहार करताना नेहमी सुरक्षित पेमेंट पद्धतीचा वापर करा. जसे की, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा विश्वसनीय वॉलेट्स. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.
गेममध्ये टॉप करण्यापूर्वी वेबसाईट यूआरएल तपासायला विसरू नका. अनेक खोट्या वेबसाईट अगदी खऱ्या आणि अधिकृत वेबसाईट्सप्रमाणे दिसतात, मात्र त्यांच्या यूआरएलमध्ये गडबड असते. त्यामुळे नेहमी वेबसाईट तपासा, यूआरएल तपासा आणि त्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. शक्य असल्यास टॉप अप केल्यानंतर पेमेंटची पावती किंवा स्क्रीनशॉट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. भविष्यात जर काही समस्या निर्माण झाली तर तुम्ही पुरावा म्हणून याचा वापर करू शकता.
Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज






