Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: हे आहेत गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट्स! तुमच्यासाठी कोणतं ठिकाण ठरणार योग्य? जाणून घ्या

Free Fire Max Best Landing Spots: गेममधील सुरुवात अतिशय दमदार व्हावी यासाठी योग्य लँडिंगची स्पॉटची निवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. लँडिंग स्पॉट निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 09:36 AM
Free Fire Max: हे आहेत गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट्स! तुमच्यासाठी कोणतं ठिकाण ठरणार योग्य? जाणून घ्या

Free Fire Max: हे आहेत गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट्स! तुमच्यासाठी कोणतं ठिकाण ठरणार योग्य? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • क्लॉक टॉवर आणि फॅक्ट्री हे आक्रमक गेमप्ले आवडणाऱ्या खेळाडूंसाठी बेस्ट स्पॉट्स मानले जातात.
  • मार्स इलेक्ट्रिक आणि रीम नाम व्हिलेज हे नव्या खेळाडूंसाठी सुरक्षित पर्याय आहेत.
  • योग्य लँडिंग स्पॉट निवडल्यास सर्व्हाइवल आणि रँक पुश करणे अधिक सोपे होते.
फ्री फायर मॅक्स (Free Fire Max) मध्ये चांगली सुरुवात अतिशय महत्त्वाची असते. गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यासाठी आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य लँडिंग स्पॉट निवडणे अतिशय गरजेचं आहे. कारण योग्य लँडिंग स्पॉट निवडल्यानंतर तुम्हाला पॉवरफुल शस्त्र, लूट आणि गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी उतरलात तर शत्रू तुमच्यावर सुरुवातीलाच हल्ला करण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्ही गेममधून लवकर बाहेर जाऊ शकता. यासाठी फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट माहिती असणे आवश्यक आहे.

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

क्लॉक टॉवर

हे फ्री फायर मॅक्समधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे चांगली लूट मिळते. इथे तुम्हाला बंदुकी, दारुगोळा आणि वैद्यकीय साहित्य मिळतं. पण या ठिकाणी अनेक प्लेअर्स उतरतात, त्यामुळे सुरुवातीलाच इथे लढाईसाठी तयार रहावे लागते. जर तुम्ही जवळून अचूक निशाणा साधू शकत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.

फॅक्ट्री

दुसरे ठिकाण म्हणजे फॅक्ट्री. अनुभवी खेळाडूंसाठी ही जागा योग्य आहे. इथे जास्त लूट मिळते. पण लक्षात ठेवा की इथे शत्रू सुद्धा खूप जास्त असतात. यामुळे या ठिकाणी उतरणार असाल तर स्मार्ट गेम्पले तयार ठेवा.

मार्स इलेक्ट्रिक

जर तुम्हाला सुरुवातीला सुरक्षित ठिकाणी राहायचे असेल तर मार्स इलेक्ट्रिक एक चांगला पर्याय आहे. इथे गर्दी थोडी कमी असते आणि जास्त लूट देखील मिळत नाही. नव्या खेळाडूंसाठी ही जागा चांगला पर्याय आहे.

रीम नाम व्हिलेज

हे एक संतुलित लँडिंग स्पॉट आहे. इथे चांगली लूट मिळते आणि जास्त लढाई देखील होत नाही. तुम्ही नवीन खेळाडू असाल आणि हळूहळू तुमचा गेम सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

पीक

फ्री फायर मॅक्समध्ये पीक देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण नकाशात मध्येच असल्याने स्ट्रॅटेजिक स्पॉट मानले जाते. इथून तुम्ही अगदी या सहजपणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता. पण या ठिकाणी अनेक प्लेअर्स उतरतात त्यामुळे हे ठिकाण थोड रिस्की आहे.

योग्य लँडिंग स्पॉट कसा निवडाल?

जर तुम्हाला आक्रमकपणे खेळायला आवडत असेल तर हॉट ड्रॉप्स म्हणजेच क्लॉक टॉवर आणि फॅक्ट्रीसारखी ठिकाणं निवडू शकता. पण जर तुम्हाला गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यावर आणि रँक पुश करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करायचं असेल तर कमी गर्दी असलेल्या ठिकाणांची निवड करा.

स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर… अशी आहे नवी टेक्नॉलॉजी

लँडिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • उतरल्यानंतर शक्य तितक्या लवकर लूट गोळा करण्यास सुरुवात करा.
  • सुरुवातील अनावश्यक लढाईंकडे दुर्लक्ष करा.
  • सेफ झोनवर नजर ठेवा.
  • शक्य तितका वेळ तुमच्या टिमसोबत राहण्याचा प्रयत्न करा.

Web Title: These are the best landing spots in free fire max which one is perfect for you read in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.