स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर... अशी आहे नवी टेक्नॉलॉजी
Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान… ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक
Lumia Health ने गेल्या महिन्यात Lumia 2 नावाचे एक नवीन डिव्हाईस लाँच केले होते. या डिव्हाईसमध्ये ईअररिंग सारखे डिझाईन दिले आहे. ईअररिंग सारखे डिझाईन असणारे हे डिव्हाईस क्रॉनिक ब्लडफ्लो डिसऑर्डर असणाऱ्या रुग्णांची मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने या नव्या डिव्हाईसचे वर्णन जगातील सर्वात लहान वेलनेस वेअरेबल उपकरण असे केले आहे. हे डिव्हाईस ईयररिंग प्रमाणे घालता येते. यामध्ये मुख्य सेंसरसह प्रोसेसर, बॅटरी आणि अनेक हेल्थ सेंसर दिले आहेत. हे डिव्हाईस झोप, अॅक्टिव्हिटी आणि ब्लड फ्लोसह 20 हेल्थ मॅट्रिक्सवर नजर ठेवते. हे डिव्हाईस एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत चालते. (फोटो सौजन्य – Lumia)
स्मार्ट इअररिंग्सची कल्पना नवीन नाही. लुमिया व्यतिरिक्त आणखी काही टेक कंपन्या आहेत, ज्या सध्या स्मार्ट इअररिंग्सवर काम करत आहेत. या स्मार्ट इअररिंग्सचे सेंसर कानाच्या मागील बाजूला लावावे लागते. या ठिकाणाहून ब्लड वेसल मॉनिटर केले जाते. या डिव्हाईसच्या मदतीने हार्ट रेट आणि ब्लड फ्लोवर लक्ष ठेवणं आणखी सोपं होतं. हे डिव्हाईस वापरण्यासाठी कान टोचण्याची आवश्यकता नसते. हे डिव्हाईस वेगवेगळ्या डिझाईन आणि फिनिशसह उपलब्ध आहे. या डिव्हाईसचे सेंसर कानाच्या मागे राहून आपले काम सुरु ठेवते.
स्मार्ट इअररिंग्सच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर हे डिव्हाईस हार्ट रेट मॉनिटरिंगसाठी अतिशय फायद्याचे आहे. तसेच तुम्ही हे डिव्हाईस सतत परिधान करून ठेऊ शकता. या डिव्हाईसचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये डिस्प्ले लावलेला नाही. ज्यामुळे वारंवार नोटिफिकेशनची कटकट नाही. हे डिव्हाईस डिस्ट्रॅक्शन फ्री ट्रॅकिंग ऑफर करते. हे डिव्हाईस दर काही मिनिटांनी नोंदी घेते, ज्या सोबतच्या ॲपमध्ये पाहता येतात. हे रक्तवाहिन्यांमधून अचूक नोंदी घेते, ज्यामुळे व्यायाम आणि इतर क्रियाकलापांदरम्यान होणारे अचानक बदल टाळले जातात.






