Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Power Bank Tips: पावर बँकचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा गॅझेट ब्लास्ट होण्याचा धोका असतो. कोणते पावर बँक खरेदी करू नये, तसेच पावर बँक चार्ज करताना कोणत्या केबलचा वापर धोकादायक ठरू शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2026 | 12:08 PM
Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Follow Us
Follow Us:
  • विश्वसनीय आणि चांगल्या कंपनीच्या पावर बँकची खरेदी करा
  • ऊन्हाळ्यात गाडीचे तापमान वाढते, यामुळे ऊन्हात ठेवलेला पावर बँक आणखी गरम होतो
  • पावर बँक चार्ज करण्यासाठी लोकल एडाप्टरचा वापर करणं धोकादायक असू शकतं
Power Bank: स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. आपली अनेक कामं स्मार्टफोनवर अवलंबून असतात. कॉलिंग, मेसेजिंग, चॅटींग, फोटोग्राफी, सर्वकाही स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज शक्य होतं. पण पूर्ण दिवस स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी त्याची चार्जिंग टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी अनेकजण पावर बँकचा वापर करतात. आपण प्रवासात पावर बँक घेऊन जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही पावर बँकची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे पावर बँक खरेदी करताना आणि त्याचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

लोकल आणि स्वस्त पावर बँक खरेदी करणं

सहसा लोकं पैसे वाचवण्यासाठी लोकल आण स्वस्त पावर बँक खरेदी करतात. या गॅझेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची क्वालिटी अत्यंत खराब असते. तसेच यामध्ये कोणतेही प्रॉपर सर्किट प्रोटेक्शन देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत पावर बँकमध्ये ओव्हरलोड होण्याची, तापमान वाढण्याची आणि शॉर्ट सर्किट होण्याची भिती असते. अनेकदा याच कारणांमुळे स्मार्टफोनचा ब्लास्ट देखील होऊ शकतो. यामुळे नेहमी विश्वसनीय आणि चांगल्या कंपनीच्या पावर बँकची खरेदी करा. यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागत असले तरी याचा वापर करताना तुम्ही सुरक्षित राहू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ऊन्हात पावर बँकचा वापर करणं

अनेक लोकं नकळतपणे चुकीच्या ठिकाणी पावर बँक ठेवतात. जसे की, गाडीचे डॅशबोर्ड. अनेकदा आपण घाईत असताना किंवा नकळतपणे पावर बँक कारच्या डॅशबोर्डवर किंवा अशा ठिकाणी ठेवतो जिथे थेट ऊन्हाचा संपर्क येतो. ऊन्हाळ्यात गाडीचे तापमान वाढते, यामुळे ऊन्हात ठेवलेला पावर बँक आणखी गरम होतो आणि लिथियम-आयन बॅटरीची तापमान सहन करण्याची क्षमता संपल्यास त्याचा ब्लास्ट होऊ शकतो.

अनेक लोकं पावर बँक चार्जिंगला लावून त्याचवेळी त्याच पावर बँकला आपला फोन देखील चार्ज करण्यासाठी लावतात आणि यानंतर फोनवर हेवी गेमिंग किंवा व्हिडीओ स्ट्रिमिंग करतात. यामुळे गॅझेट्सवर दबाव पडतो आणि त्यामध्ये उष्णता वाढू शकते. यामुळे गॅझेट्सचा ब्लास्ट होण्याचा धोका असतो.

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

दिर्घकाळ पावर बँक चार्ज करणं

पावर बँक चार्ज करण्यासाठी लोकल एडाप्टरचा वापर करणं धोकादायक असू शकतं. तसेच पावर बँक चार्ज झाल्यानंतर देखील बराच वेळ त्याला प्लग इन ठेवणं असुरक्षित आहे. प्रत्येक पॉवर बँक विशिष्ट ॲम्पिरेज आणि व्होल्टेज रेटिंगसह येते. तरीही, लोक अनेकदा हे गॅझेट रात्रभर चार्जिंगला लावून ठेवताना फोनसाठी असलेल्या कोणत्याही ‘फास्ट चार्जर’चा वापर करतात. जेव्हा पावर बँक पूर्णपणे चार्ज होते त्यानंतर यामध्ये करंट बसू शकतो. ओवरचार्जिंगमुळे पावर बँकमधील बॅटरी फुगू शकते आणि ब्लास्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त, चुकीच्या किंवा डॅमेज केबलचा वापर करून पावर बँक चार्ज केल्यास ब्लास्ट होऊ शकतो.

Web Title: These are the reasons of power bank blast know how to stay safe hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
1

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
2

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
3

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
4

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.