
Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन... फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास
Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
Huawei X7 Fold हा पुढील पिढीचा फोल्डेबल स्मार्टफोन असू शकतो. यामध्ये मोठा आणि स्मूद फोल्डेबल डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, जो हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. पावरफुल Kirin चिपसेट, जास्त रॅम आणि स्टोरेजसह हा फोन परफॉर्मेंसच्याबाबतीत फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये एक आदर्श पर्याय ठरणार आहे. HarmonyOS चे नवीन वर्जन, मजबूत बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसह Huawei X7 अशा यूजर्सना आकर्षित करते, ज्यांना प्रिमियम स्मार्टफोन अनुभव पाहिजे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Motorola Razr Fold कंपनीचा पहिला बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन असणार आहे. या आगामी फोनमध्ये मोठा इनर डिस्प्ले आणि एक कामाची कवर स्क्रीन दिली जाणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा फोन स्टाइलस सपोर्टसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि क्रिएटिव काम अधिक सोपं होणार आहे. या डिव्हाईसमधील कॅमेरा सेटअप देखील हाई-रिजॉल्यूशन असण्याची शक्यता आहे.
Vivo X Fold 6 हा कंपनीचा पुढील प्रीमियम फोल्डेबल फोन असू शकतो. काही समोर आलेल्या लिक्सवर विश्वास ठेवला तर यामध्ये लेटेस्ट Snapdragon फ्लॅगशिप प्रोसेसर आणि हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो मागील मॉडेलच्या तुलनेत मोठं अपग्रेड असणार आहे. यामध्ये आकर्षक डिझाईन, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि पावरफुल परफॉर्मेंसमुळे फोटोग्राफी आणि मल्टीटास्किंगचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
Apple चा पहिला फोल्डेबल आयफोन देखील याचवर्षी लाँच केला जाणार आहे. हा फोन आयफोन फोल्ड या नावाने लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, याचे डिझाईन बुक-स्टाइल असणार आहे आणि यामध्ये क्रीज-फ्री डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. प्रीमियम टाइटेनियम बॉडी, साइड-माउंटेड टच आयडी आणि टॉप-लेवल कॅमेरा सेटअपमुळे हा फोन इतर फोल्डेबल फोन्सपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.