Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….

काही रोबोट्स ऑफीसमध्ये कामं करण्यासाठी तयार केलेले असतात, काही रोबोट्स घरातील कामं करण्यासाठी तयार केले जातात. आता पोलँडमधील कंपनीने एक असा रोबोट तयार केला आहे, जो भुतासारखा दिसतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 11:55 AM
अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची 'ही' कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही....

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची 'ही' कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही....

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही काळापासून रोबोटिक्स फील्डमध्ये बराच बदल पहायला मिळाला आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्या अनोखे रोबोट्स तयार करण्यात व्यस्त आहेत. कंपन्यांनी तयार केलेल्या प्रत्येक रोबोटची खासियत वेगळी असते. म्हणजेच प्रत्येक रोबोटमध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले असतात.

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण

प्रत्येक रोबोटचा वेगळा लूक

Elon Musk ची कंपनी टेस्ला देखील ऑप्टिमस नावाच्या एका रोबोटवर काम करत आहे. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, OpenAI देखील असा रोबोट तयार करत आहे ज्यामध्ये मानवी कामं करण्याची क्षमता दिली जाईल. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांचे रोबोट जगासमोर सादर केले आहेत. प्रत्येक रोबोटचा लूक वेगळा असतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका आगळ्यावेगळ्या रोबोटबद्दल सांगणार आहोत. हा रोबोट भुतासारखा दिसतो. अनोखी गोष्ट म्हणजे हा रोबोट पाणी देखील पितो. हा रोबोट माणसांप्रमाणे अनेक कामं करू शकतो. (फोटो सौजन्य – X) 

पोलँड कंपनीने तयार केला रोबोट

पोलँडची कंपनी Clone Robotics या रोबोटवर काम करत आहे. हा रोबोट अगदी भुतासारखा दिसतो. कंपनीचे को-फाउंडर आणि सीईओ धनुष राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे की, त्यांना एक असा रोबोट तयार करायचा होता जो sci-fi चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणू शकेल. धनुष यांनी सांगितलं की, त्यांच्या कंपनीची सुरुवात 2021 मध्ये झाली होती. या कंपनीचा उद्देश असा होता की, त्यांना एक असा रोबोट तयार करायता आहे, जो माणसांप्रमाणे काम आणि हालचाल करू शकणार आहे. कंपनीचा रोबोट दरवाजे उघडण्यापासून ते फळे कापण्यापर्यंत सर्व काही करतो. याच कामांमुळे हा रोबोट लोकांसाठी त्यांचा साथी बनू शकतो.

Clone’s Co-founder & CEO Dhanush Radhakrishnan (@dhanushisrad) discusses building musculoskeletal androids in an interview with Anastasiia Nosova.(@AnastasiInTech) pic.twitter.com/RP0QA7v22X — Clone (@clonerobotics) September 12, 2025

हातापासून झाली होती सुरुवात

धनुष ने सांगितलं की, त्यांनी ह्यूमनॉइड रोबोट तयार करण्याची सुरुवात हातापासून केली होती. मानवी हात हा एक असा अवयव आहे, ज्याचा सर्वात जास्त वापर केला जातो. बाकी अवयवांच्या तुलनेत मानवी हात सर्वाधिक हालचाल करतो. याच सर्वांचा विचार करून कंपनीने रोबोटिक हात बनवण्याची प्रक्रिया सुरु केली. हा हात तयार करण्यासाठी कंपनीला तब्बल 18 महिन्यांचा कालावधी लागला होता. यानंतर कंपनीने एका वर्षात संपूर्ण रोबोटिक शरीर तयार केले. कंपनी सध्या या रोबोटला प्रशिक्षण देत आहे आणि अखेरीस वस्तू ओळखू शकणारी नवीन त्वचा जोडेल, ज्यामुळे नाजूक कामे देखील सोपी होतील.

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

मोटार आणि बॅटरीची गरज नाही

बाकी रोबोट्सचा विचार करता या रोबोटमध्ये अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इतर रोबोट्सना त्यांची काम पूर्ण करण्यासाठी जशी मोटार आणि बॅटरीची गरज असते. मात्र धनुष यांच्या कंपनीने तयार केलेला हा ह्यूमनॉइड रोबोट पाण्यावर चालतो. हे एका कॉम्पॅक्ट पंपद्वारे चालवल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करते, ज्याला कंपनी हायड्रॉलिक हार्ट म्हणते. ते रोबोटच्या स्नायूंमध्ये पाणी पंप करते. हे पाणी सिस्टीममध्येच राहते आणि गरज पडल्यास त्यात अतिरिक्त पाणी देखील घालता येते.

Web Title: This company develops humanoid robot who looks like ghost he can drink water also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी
1

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे
2

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
3

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर
4

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.