लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स
Xiaomi लवकरच त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Xiaomi 17 लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये दोन डिव्हाईसचा समावेश असणार आहे. कंपनी या सिरीजअंतर्गत Xiaomi 17 Pro आणि 17 Pro Max हे दोन डिव्हाईस लाँच करणार आहे. यासंबंधित माहिती कंपनीने त्यांच्या सोशल मीडियावर दिली असून, कंपनीने याचा टिझर देखील अधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे नवीन डिव्हाईस 2026 चे दोन सर्वात अनोखे प्लॅगशिप डिव्हाईस असणार आहेत. याचा पहिला लूक आता समोर आला आहे.
कंपनीने शेअर केलेल्या टिझर व्हिडीओमध्ये फोनचे डिझाईन देखील उघड झाले आहे, जिथे यावेळी एक नवीन बोल्ड डिझाइन पाहायला मिळत आहे. यासोबतच, फोनच्या मागील बाजूस एक सेकंडरी डिस्प्ले देखील दिसत आहे, ज्याला शाओमीने मॅजिक बॅक स्क्रीन असे नाव दिले आहे. म्हजजेच या स्मार्टफोनच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूला डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
एवढंच नाही तर या नवीन Xiaomi 17 सीरीजमध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेनरेशन 5 प्रोसेसर देखील दिला जाणार आहे. ज्यामुळे हे आगामी डिव्हाईस या प्रोसेसरसह लाँच केले जाणारे जगातील पहिले स्मार्टफोन ठरणार आहेत. सध्या स्मार्टफोनसोबतच त्याच्या प्रोसेसरची देखील चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा चिपसेट नेक्स्ट लेवल परफॉरमेंस ऑफर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे डिव्हाइस सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड डिव्हाइसेसपैकी एक बनतात. चला जाणून घेऊया की हे दोन्ही डिव्हाइस कधी लाँच होतील.
रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 Pro आणि 17 Pro Max या महिन्याच्या शेवटपर्यंत चीनमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. मात्र हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबली कधी लाँच केले जाऊ शकतात, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याच वेळी, भारतात Xiaomi नियमित मॉडेलसह अल्ट्रा मॉडेल ऑफर करते परंतु यावेळी अल्ट्रा व्हेरिएंट नाही, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की कंपनी भारतात नियमित Xiaomi 17 आणि Xiaomi 17 Pro Max लाँच केले जाऊ शकतात.
रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 सीरीजमध्ये Xiaomi 17, 17 Pro आणि 17 Pro Max या तीन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. कंपनीने शेअर केलेल्या टिझरमध्ये जास्त माहिती दिली नाही. पण यावेळी नवीन रियर डिस्प्लेची चर्चा आहे. कंपनीच्या मते, मॅजिक बॅक स्क्रीन अनेक कामे सोपी करू शकते. हे वेगवेगळे क्लॉक फेस दाखवू शकते. तसेच, या स्क्रीनवरून मागील कॅमेरा वापरून सेल्फी घेणे सोपे होईल. हा डिस्प्ले व्ह्यूफाइंडर म्हणून काम करू शकतो. तसेच, काही अॅप्सच्या सूचना या स्क्रीनवर मिळू शकतात.