Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास…

टिम कूकने कंंपनी प्रचंड तोट्या होती. कंपनी बंद पडेल असे वाटत होते. पण टिम कुकच्या आगमनानंतर एका वर्षातच कंपनीमध्ये नफा सुरु झाला. टिम कूक सीईओ म्हणून, कंपनीच्या जगभरातील विक्री आणि कामकाजाची जबाबदारी घेत होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2025 | 09:00 AM
Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास...

Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास...

Follow Us
Close
Follow Us:
  • 2011 मध्ये टिम कुक बनले अ‍ॅपलचे CEO
  • टिम कुक च्या Apple ने जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब पटकावला
  • iPhone, iPad आणि MacBook च्या यशात टिम कुक यांचा मोठा वाटा

1 नोव्हेंबर म्हणजेच आज Apple चे सीईओ टिम कुक यांचा वाढदिवस आहे. आज टिम कूक यांचा 65 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. टिम कुक हे जगातील टॉप सीईओमधील एक आहेत. टिम कूक यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. सामान्य घरात जन्म झाल्यापासून ते एका मोठ्या टेक जायंट कंपनीचा सिईओ बनेपर्यंत टिम कूक यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या याच संघर्षाची कथा आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

असा झाला Apple मध्ये प्रवेश

टिम कूक यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1960 रोजी अलाबामा, अमेरिका येथे झाला. त्यांचा जन्म एका सामान्य कुटूंबात झाला होता. त्यांची आई गृहिणी आणि वडील एक शिपयार्ड वर्कर होते. त्यांनी 1982 मध्ये Auburn University मधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी 1988 मध्ये Duke University मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. ग्रेजुएशननंतर कुक यांनी कंप्यूटर टेक्नोलॉजीमध्ये त्यांच्या करियरला सुरुवात केली. त्यांनी IBM कंपनीतून सुरुवात केली. 12 वर्षांपर्यंत IBM सह काम केल्यानंतर त्यांनी 1994 मध्ये कुक इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये रिसेलर डिव्हीझनचे सिईओ बनले. तीन वर्षांनंतर त्यांनी कॉम्पॅक कॉम्प्युटर कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेट मटेरिअल्सचे वाइस प्रेसिडेंट या पदाचा कारभार स्विकारला. इथे त्यांनी केवळ 6 महिने काम केले होते. त्यानंतर टिम कुक यांनी Apple मध्ये प्रवेश केला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple मध्ये प्रवेश करणं सोपं नव्हतं

कुकने Apple मध्ये 12 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये सांगितलं की, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रगती एकाच निर्णयातून झाली, Apple मध्ये सामील होणे. तथापि, हा निर्णय सोपा नव्हता. कुकने 1998 मध्ये Apple मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कंपनीने iMac, iPod, iPhone किंवा iPad सारखे कोणतेही गॅझेट तयार केले नव्हते. त्यामुळे कंपनी तोट्यात होती. कुकच्या मते, Apple मध्ये सामील होण्यापूर्वी त्यांना कंपनीत सामील न होण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि कंपनीचे भविष्य चांगले नसल्याचे सांगण्यात आले होते.

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

स्टीव्ह जॉब्स यांनी कुककडे सोपवली सीईओची सूत्रे

कुक आधी कंपनीचे एक्जिक्यूटिव वाइस प्रेजिडेंट आणि नंतर सिईओ झाले. 2011 पासून टिम कूक यांनी टेक जायंट कंपनी Apple च्या सिईओ पदाचा कारभार हाती घेतला आहे. 11 ऑगस्ट 2011 रोजी टिम कुकला एक कॉल आला आणि या कॉलमुळे कुकचे संपूर्ण आयुष्य बदलले. हा कॉल स्टीव जोब्स यांचा होता. त्याने कुकला त्यांच्या घरी बोलावले. जोब्स त्यावेळी कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2003 मध्ये त्यांना या आजाराचे निदान झाले. जेव्हा कुक जोब्सच्या घरी गेले तेव्हा जोब्स यांनी कुकला कंपनीच्या सिईओ पदाचा कारभार सोपवला.

FAQs (संबंधित प्रश्न)

टिम कुक कोणत्या कंपनीचे CEO आहेत?
Tim Cook हे Apple Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांनी स्टीव्ह जॉब्सनंतर 2011 मध्ये हे पद स्वीकारले.

टिम कुक यांनी Apple कंपनीत केव्हा प्रवेश केला?
Tim Cook यांनी 1998 साली Apple मध्ये काम सुरू केले आणि सुरुवातीला Senior Vice President म्हणून कार्य केले.

टिम कुक यांच्या नेतृत्वाखाली Apple मध्ये कोणते मोठे बदल झाले?
टिम कुक यांनी पदभार हाती घेतल्यानंतर Apple ने iPhone, iPad, MacBook सारख्या प्रॉडक्ट्समध्ये मोठी प्रगती केली आणि कंपनीने अब्जावधी डॉलरची कमाई केली. Apple जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली.

Web Title: Tim cook is celebrating his 65th birthday know about his inspiring journey tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य
1

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

Google Chrome वापरकर्त्यांसाठी सरकारचा ‘उच्च-जोखीम’ इशारा! सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी त्वरित अपडेट करा
2

Google Chrome वापरकर्त्यांसाठी सरकारचा ‘उच्च-जोखीम’ इशारा! सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी त्वरित अपडेट करा

Tech Tips: सोशल मीडियाचे असेही आहेत फायदे, वाचून तुम्हीही व्हाल हैराण! जाणून घ्या
3

Tech Tips: सोशल मीडियाचे असेही आहेत फायदे, वाचून तुम्हीही व्हाल हैराण! जाणून घ्या

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही
4

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.