iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
अॅपलच्या आगामी आयफोन 18 सिरीजबद्दल चर्चा सुरु झाली आहे. ही आयफोन सिरीज 2026 मध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र याबाबतचे अपडेट्स लीक होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी आगामी आयफोन 18 सिरीजमधील प्रो मॉडेल्सबाबत एक मोठी अपडेट आली होती. असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॉडल्समध्ये सॅटेलाइट 5G सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन सिरीजमध्ये अॅपलच्या अॅडव्हांस A20/A20 Pro चिपसेटचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या सर्व अपडेट्सव्यतिरीक्त आता प्रो मॉडेलच्या डिझाईनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रो मॉडेलचे डिझाईन कसे असणार, त्यामध्ये कोणता बदल केला जाणार आहे, याबाबत अपडेट्स लीक झाले आहेत. एवढंच नाही तर आयफोन 17e चे डिझाईन देखील लीक झाले आहेत. हे दोन्ही आयफोन येत्या वर्षात लाँच केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
डिजिटल चॅट स्टेशनने आयफोन 18 प्रो मॉडेल्स आणि आयफोन 17e बाबत माहिती दिली आहे. चाइनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये डिजिटल चॅट स्टेशनने सांगितलं आहे की, टेक जायंट कंपनीने 18 प्रो मॉडेल्सच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला नाही. आगामी आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्स 17 प्रो मॉडेल्सप्रमाणेच दिसणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, अपकमिंग सीरीजमध्ये अॅपलचा मोठा हॉरिजेंटल कॅमेरा मॉड्यूल दिला जाण्याची शक्यता आहे. या लीकवर विश्वास ठेवणं यासाठी शक्य आहे कारण, अॅपलने आयफोन 17 प्रो मॉडेल्स नवीन डिझाइनसह लाँच केले आणि कंपनी काही वर्षे एकाच डिझाइनला चिकटून राहते. म्हणजेच कंपनी एकच डिझाईन त्यांच्या आगामी मॉडेल्समध्ये देखील देते.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला आयफोन 17 सिरीजमधील परवडणारे व्हेरिअंट 17e लाँच केले जाणार आहे. या आयफोनमध्ये डायनामिक आईलँड दिला जाण्याची शक्यता आहे. तथापी, या आयफोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाली प्रोमोशन टेक्नोलॉजी दिली जाणार नाही. मात्र डायनामिक आईलँडच्या रुपात ग्राहकांना कमी किंमतीत प्रो मॉडेलवाला एक फीचर मिळणार आहे. आयफोन 17e ला देखील लेटेस्ट लाइनअपच्या डिझाईन लँग्वेजसह लाँच केला जाणार आहे. यामध्ये डायनामिक आईलँडसह 6.1 इंचचा OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. हा आयफोन पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 60,000-65,0000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.






