Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

TRAI New Series: स्कॅम आणि फ्रॉड कॉल्सना आळा घालण्यासाठी आता ट्रायने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच 1601 नंबर सीरीज सुरु केली जाणार आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना संस्थांचे कॉल ओळखणं सोपं होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 10:48 AM
स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • TRAIने वीज, पाणी, गॅस, एलपीजी आणि कुरिअर सेवांसाठी 1601 नंबर सीरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 1601 नंबरचा वापर फक्त सर्विस आणि ट्रान्झॅक्शनशी संबंधित कॉलसाठी होणार असून, प्रमोशनल कॉल्ससाठी तो वापरता येणार नाही.
  • या निर्णयामुळे सामान्य मोबाईल नंबरवरून येणारे संभाव्य फ्रॉड कॉल ओळखणे नागरिकांना तुलनेने सोपे होण्यास मदत होणार आहे.
ट्रायने सामान्य नागरिकांना स्कॅमर्सपासून दिलासा मिळावा यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या स्मार्टफोनवर आलेला कॉल एखाद्या कंपनीच्या सर्विससाठी आहे की फ्रॉड आहे, हे ओळखणं आता आणखी सोपं होऊ शकतं. कारण ट्रायने विज, पाणी, गॅस, एलपीजी आणि कुरिअर सेवांसाठी 1601 नंबर सीरीज सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिरीजच्या नंबरचा वापर आता कंपन्या त्यांच्या आणि ट्रांजेक्शनसंबंधित कॉलसाठी करणार आहे.

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

फ्रॉड कॉल्सना आळा घालण्यासाठी होणार मदत

सध्या बँक, कंपन्या आणि इतर सेवा देणाऱ्या संस्था अनेक कॉल नॉर्मल 10 अंकांच्या नंबरवरून करतात. याचा फायदा स्कॅमर्स आणि सायबर गुन्हेगारांना होतो. स्कॅमर्स आणि सायबर गुन्हेगार कंपनी किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा करत सामान्य लोकांना कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करतात. मात्र आता असं होणार आहे. कारण आता वेगळ्या नंबर सिरीजमुळे या संस्थांचे कॉल ओळखणं आणखी सोपं होणार आहे. तसेच, ट्रायने घेतलेल्या या निर्णयामुळे नॉर्मल मोबाईल नंबरवरून येणाऱ्या फ्रॉड कॉलवर आळा घालण्यासाठी देखील मदत होणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

या कंपन्यांना मिळणार 1601 नंबर

ट्रायने 1601 सीरीज टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जनोपयोगी सेवा, कुरिअर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वीज वितरण कंपन्या, जलसेवा, शहरी गॅस कंपन्या आणि एलपीजी वितरक यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, कुरिअर, पार्सल वितरण, एक्सप्रेस लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक कंपन्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

90 दिवसांत करावे लागेल मायग्रेशन

पहिल्या टप्प्यात येणाऱ्या संस्थांना 1601 नंबरवर मायग्रेशन आणि ऑनबोर्डिंग 90 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. नंबर जारी करण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्या संबंधित संस्थेची तपासणी करतील. याचा अर्थ असा आहे की, कोणालाही थेट 1601 नंबर दिला जाणार नाही.

1601 नंबरवरून नाही होणार प्रमोशनल कॉलिंग

ट्रायने स्पष्टपणे सांगितलं आहे की, 1601 नंबरचा वापर जाहिराती किंवा प्रमोशनल कॉल्ससाठी केला जाऊ शकत नाही. याचा वापर केवळ सर्विस आणि ट्रांजेक्शनसंबंधित महत्त्वाच्या कॉल्ससाठी होणार आहे.

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

सामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम?

खरं तर आपल्या फोनवर येणारे फ्रॉड कॉल हे सामान्य नागरिकांची सर्वात मोठी समस्या आहे. स्कॅमर्स आणि सायबर गुन्हेगार नॉर्मल मोबाईल नंबरवरून बँक, विज कंपनी, कुरिअर किंवा दुसऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचा दावा करत नागरिकांची फसवणूक करत होते. मात्र आता नंबर सिरीजमुळे खऱ्या आणि खोट्या कॉलमधील फरक ओळखणं अतिशय सोपी आहे. तरीही, केवळ फोन नंबर ‘1601’ आहे म्हणून त्या कॉलवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. फोनवर कधीही ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगविषयक माहिती शेअर करू नये.

Web Title: Trai 1601 number series new caller id system for utility and courier service calls tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
2

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.