स्मार्टफोनला पर्याय शोधताय? 'हे' आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी
तुम्ही देखील एखादा 4G फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याला 4G फीचर फोन गिफ्ट करायचा आहे का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता आम्ही तुम्हाला 3 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या काही 4G फीचर फोन्सबद्दल सांगणार आहोत. हे फोन चांगला कॉलिंग अनुभव, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि यूपीआय सपोर्टसह इतर अनेक फीचर्स ऑफर करतात. चला तर मग 3 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या 4G फीचर फोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
कार्बोन के 1 4G हा बजेट फ्रेंडली फीचर फोन्सपैकी एक आहे. या फोनमध्ये 4G VoLTE कॉलिंगसपोर्टसोबतच स्मार्ट अॅप्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये मनोरंजनासाठी जिओहॉटस्टार, म्युझिकसाठी जिओ सावन आणि पेमेंटसाठी जिओ साऊंड पे प्री-इंस्टॉल आहेत. या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये डिजीटल कॅमेरा आणि 1,000mAh बॅटरी दिली आहे. या डिव्हाईसची किंमत 1,299 रुपये आहे. फोनमध्ये ब्लूटूथ, एफएम रेडिओ आणि वाढवता येणारी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. हा फोन 123 रुपयांच्या मंथली जिओ रिचार्ज प्लॅनला देखील सपोर्ट करतो, ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे आणि यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 14GB डेटा आणि 300 एसएमएस ऑफर केले जाातात.
एचएमडी 101 4G फोनमध्ये अधिक चांगल्या व्हॉईस कॉलिंग अनुभवासाठी 4G VoLTE सपोर्ट दिला आहे. हा फोन मजबूत हार्ड प्लास्टिक डिझाइनसह येतो, जो दैनंदिन वापरासाठी बनवला आहे. फोनमध्ये रुंद किपॅडसह 2 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 1,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत 1,949 रुपये आहे. हे डिव्हाईस रिमुव्हेबल बॅटरी, वायरलेस एफएम रेडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आणि टॉर्चलाईटने सुसज्ज आहे. जर तुम्हाला दिर्घकाळ बॅटरीसह कॉलिंगसाठी फोन पाहिजे असेल तर एचएमडी 101 4G एक चांगला पर्याय ठरणार आहे.
हा फोन छोटा डिस्प्ले आणि डिजिटल कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये 4G VoLTE सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये टाईप करण्यासाठी किपॅड आहे. हे डिव्हाईस वायरलेस एफएम, ब्लूटूथ, वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. टाइप-सी पोर्टमुळे चार्जिंग करणं अधिक सोयीस्कर ठरतं. फोनमध्ये 1.8 डिस्प्ले आणि स्मार्ट अॅप सपोर्ट दिला आहे. या फोनची किंमत 1,879 रुपये आहे.
हा या प्राईज सेगमेंटमधील एक फिचर पॅक्ड फोन आहे. यामध्ये 3 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एआय (AI) व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, ब्लूटूथ कॉलिंग, वायरलेस एफएम रेडिओ आणि मोठी बॅटरी दिली आहे. फोनमध्ये स्मार्ट अॅप सपोर्ट आणि फोटो क्लिक करण्यासाठी सिंगल कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 2,000mAh बॅटरी आहे. फोनची किंमत 2,369 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आहे. डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यात ‘चार्जिंग डॉक’ देण्यात आला आहे.
Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
नोकिया 106 4G फोनशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही. या फोनमध्ये 4G VoLTE, यूपीआय सपोर्ट आणि 1,450mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपी3 प्लेबॅक, ब्लूटूथ आणि वाढवता येणारी स्टोरेज क्षमता देखील आहे. या फोनची किंमत 2,324 रुपये आहे.






