Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत... काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
फोनमधील मुख्य कॅमेरा रोजच्या जीवनातील फोटो क्लिक करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. हा कॅमेरा सामान्यत: 1x मध्ये असतो. यामध्ये सर्वात जास्त मेगापिक्सेल आणि सर्वात चांगली लाईट सेंसिंग पावर असते. पण जर तुम्हाला कोणत्या बिल्डिंग किंवा एखादा ग्रुप फोटो क्लिक करायचा असेल तर सर्व लोकं एकाच फ्रेममध्ये यावीत यासाठी तुम्ही वाईड अँगल कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा सहसा 0.5x मध्ये येतो. या कॅमेरा जास्त क्षेत्रफळ एकत्र कव्हर करतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
तसेच, जर तुम्हाला दूरची एखादी गोष्ट जवळून पाहायची असेल जसे की चंद्राचा फोटो किंवा दूर एखादा उभा असलेला व्यक्तीचा फोटो तर त्यासाठी तुम्ही टेलिफोटो कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा झूम केल्यानंतर देखील फोटोची क्वालिटी खराब होऊ देत नाही. मात्र मुख्य कॅमेऱ्याने जर तुम्ही जास्त झूम केले तर फोटोची क्वालिटी खराब किंवा ब्लर होऊ लागते. काही फोनमध्ये मॅक्रो कॅमेरा देखील दिला जातो, जो अतिशय जवळून छोट्या वस्तूंचा फोटो क्लिक करण्यासाठी डिझाईन केलेला असता.
हल्ली अनेक स्मार्टफोन्समध्ये एक डेप्थ सेंसर किंवा डेप्थ कॅमेरा देखील दिला जातो. या कॅमेऱ्याचे काम फोटो क्लिक करणं नसतं, तर या कॅमेऱ्याचे काम आहे की, फोटोमध्ये कोणती वस्तू जवळ आहे आणि कोणती वस्तू दूर आहे. या माहितीच्या मदतीने फोन तुमच्या पोर्ट्रेट फोटोमध्ये बॅकग्राऊंड ब्लर केले जाते आणि केवळ व्यक्तीच्या चेहऱ्यावर फोकस केला जातो.
फोनमध्ये जितके जास्त कॅमेरे फोटोची क्वालिटी तितकीच चांगली येणार, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण कॅमेऱ्याच्या संख्येवर फोटोची संपूर्ण क्वालिटी अवलंबून नसते. सहसा मार्केंटिंगसाठी कंपन्या फोनमध्ये तीन किंवा चार कॅमेरे देतात. पण त्यापैकी केवळ एक किंवा दोन कॅमेऱ्यानेच चांगला फोटो क्लिक केला जातो. इतर कॅमेरे कमी मेगापिक्सेलचे आणि केवळ नावापुरते दिले जातात. फोन खरेदी करताना कॅमेऱ्यांची संख्या पाहण्यापेक्षा क्वालिटी तपासा.






