Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पॅम कॉल आणि मेसेजपासून मिळणार सुटका, TRAI ने जारी केले नवीन नियम; कंपन्यांना भरावा लागणार लाखोंचा दंड

ट्रायने जारी केलेले नवीन निमय स्पॅमर्सची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या नियमांचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. ट्रायने एक नवीन डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अ‍ॅप लाँच केलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2025 | 12:35 PM
स्पॅम कॉल आणि मेसेजपासून मिळणार सुटका, TRAI ने जारी केले नवीन नियम; कंपन्यांना भरावा लागणार लाखोंचा दंड

स्पॅम कॉल आणि मेसेजपासून मिळणार सुटका, TRAI ने जारी केले नवीन नियम; कंपन्यांना भरावा लागणार लाखोंचा दंड

Follow Us
Follow Us:

स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजपासून तुम्ही देखील कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने नवीन नियम जारी केले आहेत. मोबाईल युजर्सना स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजपासून सुटका मिळावी या उद्देशाने हे नवीन निमय जारी करण्यात आले आहेत. ट्रायने जारी केलेल्या नियमांत सांगितलं आहे की, आता स्पॅम कॉल्सची संख्या योग्यरित्या न सांगणाऱ्या कंपन्यांना 2 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजबाबत कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.

Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स

ट्रायने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना कॉल आणि एसएमएस पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत, जसे की असामान्यपणे जास्त कॉलची संख्या, कमी कॉल कालावधी आणि इनकमिंग-आउटगोइंग कॉलचे प्रमाण. यामुळे रिअल टाइममध्ये संभाव्य स्पॅमर्स ओळखणे सोपे होईल. ट्रायने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना असामान्यपणे ऑपरेटरना कॉल आणि एसएमएस पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत जसे की अधिक कॉल करणारे, कमी कॉल कालावधी आणि इनकमिंग-आउटगोइंग कॉलचे प्रमाण. या पॅटर्नमुळे रिअल टाइममध्ये संभाव्य स्पॅम कॉल्सना ओळखणं अधिक सोपं होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ट्राय कंपन्यांकडून लाखोंचा दंड आकारणार

ट्रायने जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास किंवा कंपनीने कोणतीही चुकीची माहिती दिल्यास दंड आकारला जाणार आहे. पहिल्यांदाच चुकीची माहिती दिल्याबद्दल 2 लाख रुपये दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा चुकीची माहिती दिल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. यानंतर, प्रत्येक चुकीसाठी कंपन्यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागेल. अनसोलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन (UCC) चा नंबर चुकीच्या पद्धतीने दिल्याबद्दल हा दंड आकारला जाईल. हा दंड चुकीच्या पद्धतीने बंद केलेल्या तक्रारी, मॅसेज हेडर आणि कंटेंट टेम्प्लेटच्या नोंदणीमध्ये निष्काळजीपणा यासाठी आकरला जातो.

ट्रायने लाँच केलं डीएनडी अ‍ॅप

ट्रायने एक नवीन डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अ‍ॅप देखील लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे, तुम्ही स्पॅम मॅसेज ब्लॉक करू शकता, तक्रारी नोंदवू शकता आणि त्यावर केलेली कारवाई पाहू शकता. टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन्स (TCCCPR) मध्ये बदल करून, TRAI ने ग्राहकांना त्यांची पसंती नोंदवल्याशिवाय UCC विरुद्ध तक्रार करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी, ग्राहकांना कॉमर्शियल कम्युनिकेशंस ब्लॉक करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पसंती नोंदवाव्या लागत होत्या. आता हे करण्याची गरज नाही.

येथे नियम लागू होणार नाहीत

हे बदललेले नियम फक्त टेलिकॉम नेटवर्कद्वारे येणाऱ्या मेसेज आणि कॉल्सना लागू होतील. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या ओटीटी अ‍ॅप्सद्वारे येणारे मेसेज आणि कॉल या नियमांतर्गत येणार नाहीत. नवीन नियमांवरील चर्चेदरम्यान अनेकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना कॉल आणि एसएमएसच्या पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत. जसे की असामान्यपणे जास्त कॉल्स, कमी कालावधीचे कॉल्स, सिम कार्ड वारंवार बदलणे, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सचे कमी प्रमाण, या सर्वांमुळे स्पॅमर्सना त्वरित ओळखले जाऊ शकते आणि त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे सामान्यांची स्पॅमर्सपासून सुटका होणार आहे.

5 दिवसांत कारवाई करावी लागेल

पूर्वी ग्राहकांना यूसीसी मिळाल्यानंतर 3 दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी लागत असे. आता ग्राहक 7 दिवसांच्या आत तक्रार नोंदवू शकतात. दूरसंचार कंपन्यांना आता 30 दिवसांऐवजी 5 दिवसांच्या आत नोंदणी नसलेल्या क्रमांकांवरून येणाऱ्या यूसीसीवर कारवाई करावी लागेल.

Web Title: Trai new rule for telecom company related to spam calls and messages know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
1

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
2

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
3

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
4

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.