Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स
Qualcomm ने Snapdragon 6 Gen 4 नावाचा नवीन प्रोसेसर लाँच केला आहे. हा प्रोसेसर मिड रेंज स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे आता मिड रेंज स्मार्टफोन्सना एक नवीन चिपसेट मिळणार आहे. हे अजूनही TSMC च्या 4nm प्रोसेसवर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, परंतु त्याचे CPU स्ट्रक्चर त्याच्या मागील वर्जनपेक्षा थोडे वेगळे आहे. येथील सेटअप 2.3 GHz च्या क्लॉक स्पीडसह प्राइम कोरद्वारे चालवला जातो. या चिपमध्ये बिल्ट-इन जनरल AI (जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस) सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक
क्वालकॉमने Snapdragon 6 Gen 4 मध्ये 11 टक्के वेगवान CPU, 29 टक्के वेगवान GPU आणि 12 टक्के सुधारित पावर एफिशिएंसी असल्याचा दावा केला आहे. Snapdragon 6 Gen 4 चा वेग 2.3 GHz आहे आणि 6 Gen 3 2.4 GHz चा टॉप स्पीड हिट करते. CPU ची रचना देखील वेगळी आहे: 6 Gen 3 वर 1+3+4 तर 6 Gen 3 वर 4+4. इतर सुधारणांबद्दल बोलायचे झाल्यास, यात फर्स्ट-इन-6-सीरीज Gen AI सपोर्ट (Int4 ऑप्टिमायझेशनसह) आणि स्नॅपड्रॅगन गेम सुपर रिझोल्यूशन (अपस्केलिंग) समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
CPU स्ट्रक्चर: 6 Gen 4 मध्ये 2.3 GHz फ्रीक्वेंसीचा एक प्राइम कोर, 2.2 GHz क्लॉक स्पीडवर तीन परफॉर्मन्स कोर आणि 1.8 GHz वर चालणारे चार एफिशिएंसी कोर आहेत. हे Kryo ब्रँडिंगसह ARM CPU कोर आहेत.
Qualcomm announced Snapdragon 6 Gen 4 SM6650 SoC.
Specifications
– 4nm TSMC process
CPU
1 × 2.3GHz A720 prime core
3 × 2.2GHz A720 performance cores
4 × 1.8GHz A520 efficiency cores
– Adreno 810 GPU
– LPDDR5 RAM
– UFS 3.1 storage
– USB 3.1 Port
– FHD+ at 144Hz refresh rate… pic.twitter.com/f7wMyj3ig3— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 12, 2025
GPU: स्नॅपड्रॅगन गेम सुपर रिझोल्यूशन 4K अपस्केलिंग, चांगल्या डायनॅमिक श्रेणीसाठी Adreno HDR आणि सुधारित फ्रेम रेट्ससाठी Adreno Frame Motion Engine यासारख्या काही स्नॅपड्रॅगन एलिट गेमिंग वैशिष्ट्यांसह एक Adreno GPU आहे.
मेमरी: चिपमध्ये 3,200 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आणि UFS 3.1 स्टोरेजसह 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आहे.
AI: Int4 प्रिसिजनसह हेक्सागोन NPU (न्यूरल प्रोसेसिंग इंजिन) आहे.
कनेक्टिविटी: Snapdragon 6 Gen 4 मध्ये Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4 (LE ऑडियोसह), USB 3.1, L1+L2+L5 लोकेशन (NavIC), आणि 5G (सब-6GHz आणि mmWave; मल्टी-सिम) आहे.
5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही…
मिसलेनियस: यात 200MP सिंगल-शॉट फोटो, क्विक चार्ज 4+ चार्जिंग, HDR10+, FHD+ @ 144Hz डिस्प्ले, क्वालकॉम एक्वास्टिक ऑडियो कोडेक, स्नॅपड्रॅगन साउंड आणि aptX सपोर्टचा समावेश आहे. येत्या काळात ही चिप असलेले फोन देखील लाँच केले जाणार आहे. त्यानंतर या प्रोसेसरचा खरा अनुभव समोर येईल. मिड रेंज स्मार्टफोनच्या जगात ही चिप एक नवीन क्रांती घडवू शकते.