
Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपण आरामात टिव्ही बघत असतो ते वेळेस अचानक रिमोट बंद पडतो. त्याचे बटण जोरजोरत दाबतो, हातावर आपटतो तरी सु्द्धा तो चालत नाही. त्यावेळेस आपल्याला असे वाटते की, रिमोट खराब झाला. दरम्यान आपण दुरुस्त किंवा नवीन आणतो, मात्र आता अजिबात घाई करु नका. नवीन रिमोट घेण्याच्या आधी तुमच्या खिशातला मोबाईल नेमका रिमोटमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे ते सांगू शकते. Check TV Remote with Phone:
आपल्या घरातले टीव्ही, AC, सेट टॉप बॉक्सचे रिमोट हे एका टेक्नॉलॉजीवर चालतात, त्याला इन्फ्रारेड म्हणतात. रिमोटच्या पुढे एक छोटा बल्ब असतो. तुम्ही बटण दाबलं की त्या बल्बमधून एक प्रकाश बाहेर पडतो. तो प्रकाश टीव्हीपर्यंत जातो आणि टीव्हीला समजतं की चॅनल बदलायचा आहे किंवा आवाज वाढवायचा आहे. या छोटा दिसणार प्रकाश डोळ्यांला दिसत नसला, तरी मोबाईलच्या कॅमेराला मात्र दिसतो. याच गोष्टीचा वापर करुन आपण मोबाईलमधला प्रॉब्लेम शोधू शकतो.
Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग
ही ट्रिक एकदम सोपी आहे.पहिल्यांदा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा.आता रिमोटचा पुढचा भाग जिथे छोटा काचेसारखा बल्ब आहे तो कॅमेऱ्यासमोर धरा.
कधी कधी बॅटरी चांगली असून पण रिमोट काम करत नाही. कारण रिमोटमध्ये जिथे बॅटरी लावतो तिथे आतमध्ये स्प्रिंग असतात. त्या स्प्रिंगवर धूळ बसते किंवा गंज लागतो. त्यामुळे बॅटरी असून पण करंट जात नाही.त्यामुळे बॅटरी बदलण्याआधी एकदा तो भाग उघडून बघा. एका कोरड्या कापडाने हलक्या हाताने तो भाग साफ करून घ्या. धूळ काढून टाका आणि मग परत बॅटरी लावून बघा. बऱ्याच वेळा एवढं केल्याने रिमोट परत चालू होतो.तर पुढच्या वेळी रिमोटने दगा दिला तर लगेच दुकानात जाऊ नका. आधी मोबाईल काढा, कॅमेरा चालू करा आणि हा 10 सेकंदाचा प्रयोग करून बघा.