
Infinix चा नवा गेमिंग फोन भारतात लाँच.. पावरफुल प्रोसेसरसह मिळणार हे दमदार फीचर्स; आकर्षक डिझाईनने वेधलं सर्वांच लक्ष
Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या
इनफिनिक्स जीटी 50 प्रो 12GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आहे. डिव्हाईस ‘ब्लॅक एबिस’ आणि ‘रेड ब्लेज’ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी या डिव्हाईससोबत 24,999 रुपयांच्या किंमतीचा ‘GT 50 Pro गेमिंग इकोसिस्टम’ फ्री देत आहे. या बॉक्समध्ये GT NX स्टेशन, GT NX कंट्रोलर, GT कूलिंग फॅन कम चार्जर आणि GT 50 Pro मॅगसेफ कवर देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Infinix)
इतकंच नाही, फोनवर निवडक प्रमुख बँक कार्ड्सद्वारे 5 हजार रुपयांचे इंस्टंट बँक डिस्काऊंट देखील मिळणार आहे. ग्राहक हा फोन ‘नो-कॉस्ट ईएमआय’ योजनेद्वारे देखील खरेदी करू शकतात. यामध्ये दरमहा 3,611 रुपयांपासून सुरुवात होते आणि 18 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळतो.
स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच एलटीपीएस अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. या स्क्रीनची पीक ब्राइटनेस 4,500 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7iचे प्रोटेक्शन मिळणार आहे. फोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड XOS 16वर चालतो.
फोनला पावर देण्यासाठी यामध्ये 4nm मीडियाटेक डाइमेंसिटी 8400 अल्टीमेट चिपसेट मिळणार आहे. ज्यासोबत माली-G720 MC7 जीपीयू मिळणार आहे. फोनमध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये ‘हाइड्रोफ्लो लिक्विड कूलिंग आर्किटेक्चर’ मिळणार आहे.
स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि f/1.59 अपर्चर देखील मिळणार आहे. फोनमध्ये f/2.2 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील मिळणार आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे.
फोनमध्ये प्रेशर-सेंसिटिव शोल्डर बटन देखील मिळणार आहे, ज्याला ‘ओपन-कट प्रेशर-सेंस GT ट्रिगर्स’ नाव दिले आहे. हे बटन 10 प्रेशर लेवल सपोर्टसह येते. यांना गेममधील विविध ॲक्शनसाठी कॉन्फिगर केले जाऊ शकते. तसेच, यांचा वापर सिस्टीम फंक्शन्ससाठी, जसे की एखादे विशिष्ट ॲप उघडणे किंवा मीडिया प्लेबॅक नियंत्रित करणे, यासाठीही केला जाऊ शकतो.
Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स
डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये X-एक्सिस लीनियर मोटर आणि इन्फ्रारेड ब्लास्टर देखील मिळणार आहे. या फोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग मिळाली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी मिळणार आहे.
Ans: इनफिनिक्स जीटी 50 प्रो च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹69,999 आहे.
Ans: हा स्मार्टफोन 'ब्लॅक एबिस' आणि 'रेड ब्लेज' या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, हा फोन Flipkart आणि इनफिनिक्सच्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल.