सरकार असावं तर असं! नागरिकांची मजाच मजा, या देशात गवर्नमेंट देतंय ChatGPT Plus फ्री सब्सक्रिप्शन
पुढारलेल्या जगात प्रत्येकजण त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कामासाठी AI चा वापर करत आहेत. AI वर असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपली कामं अगदी चुटकीसरशी केली जाऊ शकतात. पण या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना पैसे खर्च करावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून आता संयुक्त अरब अमीरात (UAE) ने एक अनोखा निर्णय घेतला आहे. या देशातील सरकार आता त्यांच्या देशातील नागरिकांना ChatGPT Plus चा फ्री अॅक्सेस देणार आहे, यासाठी नागरिकांना कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. असं करणारा संयुक्त अरब अमीरात हा पहिली देश ठरला आहे.
ओपनएआई आणि UAE सरकार यांच्यामध्ये एक करार झाला आहे. या करारानुसार, देशातील सर्व नागरिकांना ChatGPT Plus चे प्रीमियम वर्जन फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ आता दुबई किंवा अबुधाबीमध्ये राहणारा कोणीही एकही पैसा खर्च न करता अॅडवांस आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सचा वापरू शकेल. सरकारने घेतलेला हा निर्णय त्यांच्या देशातील नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या भागिदारीमुळे केवळ ChatGPT Plus चे प्रीमियम वर्जन फ्रीमध्येच मिळणार नाही तर अबू धाबीमध्ये एक मोठं एआय डेटा सेंटर “Stargate UAE” देखील तयार केलं जात आहे. याचा उद्देश UAE ला टेक्नोलॉजीचा ग्लोबल हब बनवणं असा आहे. हा प्रकल्प OpenAI च्या “AI for Countries” उपक्रमाचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
ChatGPT Plus चे मंथली सब्सक्रिप्शन 20 डॉलर म्हणजेच 1700 रुपये आहे. मात्र आता UAE मध्ये राहणाऱ्या लोकांना ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. दर महिन्याला 1700 रुपयांची बचत आणि त्या बदल्यात, एक शक्तिशाली एआय असिस्टंट, तेही जगातील सर्वात शक्तिशाली मॉडेलपैकी एक. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सरकार आणि OpenAI ने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश केवळ टेक्नोलॉजीचा विकास नाही तर प्रत्येक नागरिकाला तंत्रज्ञानाने जोडणं असा आहे. अभ्यास असो किंवा व्यवसाय, हेल्थकेयर असो किंवा एनर्जी सेक्टर, प्रत्येक नागरिकाने टेक्नोलॉजीचा वापर केला पाहिजे असा या निर्णयाचा उद्देश आहे. या प्रोजेक्टच्या मदतीने लोकं टेक्नोलॉजीसोबत जोडले जाऊ शकतात, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला AI चा फायदा घेता येणार आहे. अनेक देशांमध्ये वेगवेगळे AI टूल्स उपलब्ध आहेत. पण या AI च्या दुनियेत आता UAE ने एक मोठं पाऊल उचललं आहे.