Ghibli नंतर आता सुरू झालाय Baby Version ट्रेंड, तुम्हालाही बनवायचा क्यूट व्हिडिओ? आताच फॉलो करा या स्टेप्स
तुम्हाला Ghibli स्टाईल ट्रेंड आठवतोय का? हा तोच ट्रेंड ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कलाकार, राजकारणी, सेलिब्रिटी आणि अगदी सर्वसामान्यांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला होता. हा ट्रेंड फारच गाजला होता. आता देखील लोकं त्यांचे Ghibli स्टाईल फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला लोकप्रिय AI चॅटबोट चॅटजीपीटी आणि ग्रोक मदत करत होते.
खरं तर हा ट्रेंड चॅटजीपीटीने सुरु केला होता. चॅटजीपीटीवर केवळ आपला फोटो अपलोड करून मेक Ghibli स्टाईल ईमेज असा प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी काही क्षणातच तुमची Ghibli स्टाईल ईमेज तयार होणार आहे. सोशल मीडियावर Ghibli स्टाईल फोटोचा ट्रेंड सुरु असतानाच आता एक नवीन ट्रेंड व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड म्हणजे बेबी वर्जन व्हिडीओ. इंस्टाग्राम आणि फेसबूकवर तुम्ही अनेक कलाकार आणि नेत्यांचे बेबी वर्जन व्हिडीओ पाहिले असतील. पण हे व्हिडीओ कसे तयार केले जातात याबाबत अद्याप अनेकांनी माहिती नाही. (फोटो सौजन्य – instagram)
व्हायरल होत असलेल्या नवीन ट्रेंडमध्ये कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिचा बेबी वर्जन व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हे व्हिडीओ फार क्यूट दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ एका मजेदार ट्रेंडचा भाग बनले आहेत. हे व्हिडीओ तयार करण्याची प्रोसेस फार सोपी आहे. बेबी वर्जन व्हिडीओ तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सची मदत घ्यावी लागणार आहे. पहिलं AI च्या मदतीने एखाद्या व्यक्तिची बेबी वर्जन इमेज तयार केली जाते आणि दुसऱ्या टूलच्या मदतीने व्हिडीओ तयार केला जातो.
सर्वात आधी तुम्हाला जो फोटो बेबी वर्जन इमेजमध्ये तयार करायचा आहे, असा फोटो निवडा. यानंतर हा फोटो ChatGPT किंवा कोणत्याही इमेज जनरेटिंग AI प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. आता एक विशेष प्रॉम्प्टचा वापर करा, ज्यामध्ये चेहऱ्याची ओळख, कपड्यांचा रंग आणि बँकग्राऊंड कलरमध्ये कोणताही बदल केला जात नाही. आता तुम्ही अपलोड केलेल्या व्यक्तिची एक बेबी वर्जन इमेज तुमच्यासमोर येईल.
आता तुम्हाला हा फोटो व्हिडीओमध्ये बदलायचा आहे. यासाठी तुम्हाला Hedra सारख्या AI टूलचा वापर करावा लागणार आहे. इथे तुम्ही प्रॉम्प्ट देऊन सांगू शकता की तुम्हाला बेबी वर्जनला व्हिडीओमध्ये कोणत्या हालचाली करताना दाखवायचे आहे. जसं की, “फोनवर बोलणे” किंवा “क्लबमध्ये नाचणे”. दिलेल्या सूचनांनुसार हेड्रा तुमचा फोटो अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये रूपांतरित करेल. जर तुम्ही एखाद्या चित्रपटावर किंवा प्रसिद्ध दृश्यावर आधारित व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही त्या दृश्याचा ऑडिओ काढू शकता आणि तो Hedra वर अपलोड करू शकता. यामुळे व्हिडिओ अधिक खरा दिसेल. ChatGPT सारख्या टूल्सवर फोटो तयार करण्याची सुविधा आता फ्री यूजर्ससाठी देखील उपलब्ध आहे, परंतु फ्री वर्जनमध्ये या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो.पेड यूजर्सना ही सुविधा जलद मिळते.