Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज
Vivo S50 स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 12GB + 512GB आणि 16GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 46,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo S50 Pro Mini च्या 12GB + 256GB या व्हेरिअंटची किंंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आहे. 12GB + 512GB मॉडेल व्हेरिअंटची किंंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 51,000 रुपये आणि 16GB + 512GB वाल्या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच सुमारे 55,000 रुपये आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेले दोन्ही स्मार्टफोन्स Vivo च्या ऑफिशियल ऑनलाइन स्टोअरद्वारे चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
vivo S50 Pro Mini – 6.31-inch 120Hz HDR AMOLED display
– Snapdragon 8 Gen 5
– Up to 16GB LPDDR5X Ultra RAM
– Up to 512GB UFS 4.1 storage
– Android 16 (Origin OS 6)
– IP68 + IP69
– 50MP main, 50MP telephoto & 8MP ultrawide camera
– 50MP selfie camera
– 6500mAh battery, 90W… pic.twitter.com/K0DjaZr4hv — Mukul Sharma (@stufflistings) December 15, 2025
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo S50 मध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1260×2750 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, Vivo S50 Pro Mini मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1216×2640 पिक्सेल आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. देन्ही स्मार्टफोन्स Android 16 बेस्ड OriginOS 6 वर आधारित आहेत.
बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर Vivo S50 आणि S50 Pro Mini या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वायरलेस चार्जिंग सपोर्ट केवळ Pro Mini व्हेरिअंटमध्ये देण्यात आला आहे, 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
परफॉर्मंससाठी Vivo S50 Pro Mini मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. तसेच स्टँडर्ड Vivo S50 मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये समान कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी Sony सेंसर, 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक अल्ट्रावाइड लेंस देण्यात आला आहे. फ्रंटला 50MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
Ans: Vivo ही एक आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँड कंपनी आहे, जी कॅमेरा, बॅटरी आणि डिझाइनसाठी ओळखली जाते.
Ans: Vivo S50 Series ही विवोची नवी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज आहे, ज्यामध्ये प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
Ans: होय, Vivo फोन कॅमेरा, पोर्ट्रेट आणि लो-लाइट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.






