Upcoming Smartphones: लवकरच येतायत धमाकेदार फोल्ड आणि फ्लिप फोन्स, 200MP कॅमेऱ्यासह मिळणार हे स्पेशल फीचर्स
तुम्ही नवीन फ्लिप आणि फोल्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. लवकरच बाजारात नवीन फ्लिप आणि फोल्ड स्मार्टफोन लाँच होणार आहेत. स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन फोल्ड आणि फ्लिप फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. खरं तर लोकांना हे फोल्ड आणि फ्लिप फोन्सने वेड लावलं आहे. लोकांची हीच क्रेझ पाहून सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्या लवकरच त्यांचे नवीन फोल्डेबल फोन लाँच करणार आहेत. आता अशाच काही आगामी स्मार्टफोन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Free Fire MAX मध्ये सुरु झालाय नवीन ईव्हेंट, Fell the electricity ईमोटसह मिळतायत हे खास रिवॉर्ड्स
सॅमसंग सध्या फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. कंपनी लवकरच त्यांचा नवीन फोल्ड आणि फ्लिप फोन लाँच करू शकते. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy Z Fold 7 लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे ज्यामध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट दिसू शकतो आणि त्यात 8.2 इंचाची मोठी आतील स्क्रीन असू शकतो. तसेच, फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगने अद्याप Samsung Galaxy Z Flip 7 ची घोषणा केलेली नाही, परंतु टिपस्टर ऑनलिक्सने संकेत दिले आहेत की आगामी फ्लिप फोन मोटोरोला रेझर प्लस सारखाच दिसेल आणि त्यात ऑल-स्क्रीन कव्हर डिस्प्ले असू शकतो. लीकमध्ये असे म्हटले जात आहे की हे दोन्ही सॅमसंग डिव्हाइस जुलै 2025 मध्ये येऊ शकतात.
मोटोरोला इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच फ्लिप फोन सेगमेंटमध्येही आपली छाप पाडत आहे. स्मार्टफोन त्यांच्या परवडणाऱ्या किमती आणि उत्तम बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जाते. आता कंपनी लवकरच Razr 60 सादर करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. फोनच्या TENAA लिस्टिंगनुसार, Motorola Razr 60 मध्ये Dimensity 7400x चिपसेट असेल आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट असेल. हे डिव्हाइस मोटोरोलाच्या हॅलो UI वर आधारित अँड्रॉइड 15 वर चालेल असे म्हटले जाते आणि त्यामध्ये 4,500mAh बॅटरी असणार आहे. Motorola Razr 60 एप्रिल 2025 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
चिनी फोन निर्माता कंपनी Honor एका नवीन बुक-स्टाईल फोल्डेबल फोनवरही काम करत आहे. Magic V4 नावाचा हा फोन पहिल्यांदा चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोवर दिसला. लीकमध्ये असे म्हटले जात आहे की फोल्डेबल डिव्हाइसमध्ये 2K रिझोल्यूशनसह 8-इंचाचा अंतर्गत डिस्प्ले आणि 6.45-इंचाचा कव्हर स्क्रीन असू शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
असं सांगितलं जात आहे की, स्मार्टफोनमधील दोन्ही डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट देऊ शकतात आणि LTPO तंत्रज्ञानाला समर्थन देतात, जे बॅटरीचे आयुष्य वाढविण्यास मदत करेल. या डिव्हाइसमध्ये 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 200 एमपीचा टेलिफोटो लेन्स असू शकतो. Honor Magic V4 मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून 2025 च्या सुरुवातीला लाँच होण्याची अपेक्षा आहे.