एप्रिलमध्ये लाँच होणार हे 5 जबरदस्त Smartphones, प्रत्येकात काय असेल खास? जाणून घ्या
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत स्मार्टफोन मार्केटमध्ये नवीन धमाका होणार आहे. कारण अनेक टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. यातील अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, जे पावरफुल बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत. बजेट-फ्रेंडली ते हाय-एंड हँडसेटपर्यंत, तुम्हाला या महिन्यात अनेक प्रकारचे स्मार्टफोन्स पाहायला मिळणार आहेत.
Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू… वाचा सविस्तर
Realme Narzo 80x हा 6,000mAh बॅटरी असलेला एक बजेट फोन असेल, तर Vivo V50e हा वक्र डिस्प्ले असलेला कॅमेरा-केंद्रित फोन असेल. बजेट गेमर्ससाठी, iQOO Z10x देखील लवकरच लाँच होईल. एप्रिल महिन्यात लाँच होणारे हे फोन अमेझॉनवर उपलब्ध असतील. चला तर मग आता एप्रिल महिन्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी पाहूया. (फोटो सौजन्य – X)
हा स्मार्टफोन 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 6400 चिपद्वारे चालवला जाईल आणि त्यात 120Hz डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमधील बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दोन तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 45W जलद चार्जिंगला सपोर्ट करते असा दावा आहे. Realme च्या मते, ते 7.94 मिमी पातळ आहे आणि त्याचे वजन 197 ग्रॅम आहे. याला IP69 रेटिंग आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स देखील आहे.
हा स्मार्टफोन देखील 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm डाइमेंसिटी 7400 चिप देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यात 120Hz स्क्रीन असेल, ज्याची कमाल ब्राइटनेस 4,500nits पर्यंत असेल आणि 90fps वर BGMI ला सपोर्ट करेल. यात 6,000mAh बॅटरीसह 80W चार्जिंग आणि बायपास चार्जिंग फीचर देखील असेल. ते 7.55mm पातळ असेल आणि 179g वजनाचे असेल.
हा स्मार्टफोन 10 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. यामध्ये Sony IMX882 सेंसर देण्यात आला आहे. Vivo V50e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये Sony IMX882 प्रायमरी सेन्सर आणि अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. यात 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील असेल. IP69 रेटिंगसह, ते पाण्याखालील फोटोग्राफीला समर्थन देते. यात क्वाड कर्व्ड डिस्प्ले आणि AI फीचर्स देखील असतील.
हा स्मार्टफोन 11 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी लाइफबद्दल बोलायचं झालं तर, iQOO Z10 मध्ये 7,300mAh बॅटरी आणि 90W फ्लॅशचार्ज सपोर्ट असेल. ते 7.89mm पातळ आणि 199 ग्रॅम वजनाचे असेल. Snapdragon 7s Gen 3 चिप, 12GB RAM, 256GB स्टोरेज, क्वाड कर्व्ड AMOLED स्क्रीन आणि 5,000nits पर्यंतची पीक ब्राइटनेस यांसारखी वैशिष्ट्ये त्यात दिसतील.
iQOO Z10x हा स्मार्टफोन 11 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Dimensity 7300 चिपसेट देण्यात आला आहे. iQOO Z10 सोबत येणारा iQOO Z10x 4nm Dimensity 7300 चिपने सुसज्ज असेल. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. 6,500mAh एमएएच बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह, हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे.