Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू... वाचा सविस्तर
2024 हे वर्ष गुगल मॅपमुळे झालेल्या अपघातांनी गाजलं होतं. अर्धवट काम झालेल्या पुलावरून गाडी नदीत पडली तर कधी गाडी जंगलात पोहोचली होती. एवढचं नाही तर गुगल मॅपच्या नादात बाईकस्वाराचा रस्त्यावरील खांब्याला धडक देऊन अपघात देखील झाला होता. या सर्व घटनांमध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला. यानंतर अनेकांनी गुगल मॅपवर प्रश्न उपस्थित केले आणि कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.
2024 मध्ये घडलेल्या या सर्व घटनानंतर गुगल मॅपने स्पष्टिकरण देखील दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा गुगल मॅपमुळे एक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलां आहे. उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मुरादाबाद या ठिकाणी हा अपघात झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अशी माहिती समोर आली आहे, एका कारने चौघेजण प्रवास करत होते. यावेळी त्यांनी अचूक मार्गासाठी गुगलचा वापर केला होता. गुगल मॅपवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट दाखवण्यात आला होता. चालकाने त्या शॉर्टकटवर गाडी नेताच, गाडी राँगवेला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलां आहे.
उत्तर प्रदेश जिल्ह्यातील मुरादाबाद या ठिकाणी गुगल मॅपमुळे एक मोठा अपघात झाला आहे. नैनितालवरून परत येत असणाऱ्या एका गाडीला कंटेनरने टक्कर दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूढापांडे क्षेत्रात नैनितालवरून परत येत असणाऱ्या गाडीला सिमेंटच्या पाईपने भरलेल्या एका कंटेनरने धडक दिली. या अपघातात सिमरन (18) आणि शिवानी (25 ) यांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली- लखनऊ हायवेवर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अचूक मार्गासाठी कारचालक गुगलचा वापर करत होता. गुगल मॅपवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट दाखवण्यात आला होता. चालकाने त्या शॉर्टकटवर गाडी नेताच, गाडी राँगवेला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. त्यामुळे गाडी लॉक झाली आणि गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर येणं शक्य झालं नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 2024 मध्ये देखील गुगल मॅपमुळे अनेक अपघात झाले होते आणि अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते आणि आता देखील गुगल मॅपमुळे होणाऱ्या अपघातांच सत्र सुरु झालं आहे. गुगल मॅपवर दाखवलेला शॉर्टकट घेणं आतापर्यंत अनेकांच्या जिवावर बेतलं आहे.