Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: पुढील आठवड्यात लाँच होणार हा जबरदस्त फोल्डेबल फोन, स्लिम प्रोफाइलसारख्या फीचर्सनी असणार सुसज्ज

Vivo Fold Smartphone: पुढील आठवड्यात एका जबरदस्त फोल्डेबल स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन विवो लाँच करणार आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2025 | 02:24 PM
Upcoming Smartphone: पुढील आठवड्यात लाँच होणार हा जबरदस्त फोल्डेबल फोन, स्लिम प्रोफाइलसारख्या फीचर्सनी असणार सुसज्ज

Upcoming Smartphone: पुढील आठवड्यात लाँच होणार हा जबरदस्त फोल्डेबल फोन, स्लिम प्रोफाइलसारख्या फीचर्सनी असणार सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Vivo X Fold 5 स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. हा फोन 25 जून रोजी ऑफिशियली चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही डिटेल्स लाँचिंगपूर्वीच समोर आले आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबाबत कंपनीने कोणतेही टिझर शेअर केलेला नाही. मात्र या स्मार्टफोनच्या चीनमधील लाँचिंगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या

या स्मार्टफोनचे प्रोडक्ट पेज Vivo च्या ऑफिशियल चाइनीज वेबसाइटवर लाईव्ह झाले आहे आणि प्री-ऑर्डर्स देखील सुरु झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षी X Fold 3 सीरीज दोन मॉडेल्समध्ये लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये स्टँडर्ड आणि प्रो यांचा समावशे आहे. मात्र यातील केवळ X Fold 3 Pro भारतात लाँच करण्यात आले होते. मात्र आगामी X Fold 5 केवळ स्टँडर्ड मॉडेलमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन 25 जून रोजी लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo चे प्रोडक्ट मॅनेजर Han Boxiao ने Weibo वर काही डिटेल्स शेअर केले आहेत. त्यांनी कंफर्म केल आहे की, इनर आणि आउटर दोन्ही स्क्रीन्सवर 8T LTPO पॅनल्स असणार आहेत, जे 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करू शकतात. दोन्ही डिस्प्ले TV Rheinland ग्लोबल आय प्रोटेक्शन आणि Zeiss Master कलर सर्टिफिकेशनला सपोर्ट करतील अशी शक्यता आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे त्याच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत सर्व लाइटिंग कंडीशन्समध्ये चांगली स्पष्टता, कम्फर्ट आणि कलर एक्यूरेसी प्रदान करेल.

Vivo X Fold 5 मध्ये IP5X डस्ट प्रोटेक्शन आणि IPX9+ वॉटर रेसिस्टेंस रेटिंग असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे 1 मीटर खोल असलेल्या पाण्यात 1,000 वेळा फोल्ड आणि अनफोल्ड होऊ शकतो. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे आगामी विवो स्मार्टफोनचे वजन आणि जाडी. मिळालेल्या माहितीनुसार, X Fold 5 त्याच्या मागील मॉडेलपेक्षा खूपच सडपातळ आणि हलका आहे, त्याचे वजन सुमारे 209 ग्रॅम आहे आणि उघडल्यावर त्याची जाडी फक्त 4.3 मिमी आहे.

Tech Tips: पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? प्रवासादरम्यान हे गॅझेट्स तुमच्यासाठी ठरतील वरदान

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo X Fold 5 मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह जोडलेला असणार आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम असण्याची शक्यता आहे. बॅटरी सुमारे 6,000mAh असू शकते, जी 90W फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. Weibo वर शेअर केलेल्या टीझरनुसार, हा फोन Apple Watch शी कनेक्ट होऊ शकतो, iCloud फाइल्स थेट अ‍ॅक्सेस करू शकतो आणि MacBooks आणि AirPods सह देखील काम करू शकतो.

Web Title: Upcoming vivo fold smartphone with slim profile tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
4

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.