Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या
सध्याच्या काळात टीव्ही ही प्रत्येकाची गरज बनली आहे. हल्ली बाजारात स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. या टीव्ही आपण अगदी एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे वापरू शकता. या टीव्हीमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचा देखील समावेश असतो. युट्युबपासून डिस्नी हॉटस्टारपर्यंत आपण सर्व काही स्मार्ट टीव्हीवर पाहू शकतो. स्मार्ट टीव्ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.
तुम्ही देखील नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन टीव्ही खरेदी करताना अनेकजण गोंधळलेले असतात. कोणत्या आकाराचा टिव्ही आपल्या घरासाठी योग्य ठरेल याबाबात अनेकांना कळत नाही. तुम्ही देखील यापैकी एक असल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा काही टिप्स आहेत ज्याच्या मदतीने तुमच्या तुमच्या घरासाठी कोणत्या आकाराचा टीव्ही योग्य ठरेल हे तुम्ही ठरवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोणत्या आकाराचा टीव्ही खरेदी करावा यासाठी अनेकांच्या मनात गोंधळ असतो. टीव्हीचा आकार जेवढा मोठा असेल तेवढा तो आपल्या घरासाठी योग्य असेल असं अनेकांना वाटतं, पण असं नाहीये. योग्य आकाराचा टीव्ही खरेदी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चुकीच्या आकाराचा टीव्ही तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव खराब करू शकतो. आता आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही ठरवू शकता की कोणता आकाराचा टीव्ही तुमच्यासाठी योग्य असणार आहे.
टीव्हीचा आकार एका कोपऱ्यापासून कोपऱ्यापर्यंत मोजला जातो. जर तुम्ही पाच फुटाच्या अंतरावरून टीव्ही पाहत असाल तर 32 किंवा 40 इंचाचा टीव्ही तुमच्या घरासाठी योग्य असणार आहे. यामुळे तुम्हाला टीव्ही पाहण्याची मजा देखील येईल आणि तुमचे डोळे देखील खराब होणार नाही. जर तुम्ही सहा किंवा सात फुटाच्या अंतरावरून टीव्ही पाहत असाल तर अशावेळी तुमच्यासाठी 45 ते 50 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे. जर तुम्ही आठ फूट किंवा त्याहून अधिक अंतरावर बसून टीव्ही पाहत असाल तर 55 ते 65 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे.
Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड
नवीन टीव्ही खरेदी करताना तिचा आकार लक्षात ठेवणं महत्त्वाचा आहे. टीव्हीची जाडी आणि त्याची रुंदी अत्यंत महत्त्वाची असते. तुम्ही तुमच्या बेडरुमसाठी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल यासाठी 32 किंवा 43 इंचाचा टीव्ही योग्य ठरणार आहे. लिव्हिंग रुमसाठी 50 इंच आकारासाठी टीव्ही तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. जर तुम्ही 4K टीव्ही खरेदी करत असाल, तर थोडे जवळ बसून तुम्ही चांगला अनुभव घेऊ शकता कारण चित्र खूप शार्प आहे, तर फुल एचडी (1080p) टीव्हीसाठी, चित्र स्पष्टपणे पाहण्यासाठी तुम्हाला थोडे दूर बसावे लागेल.