फोटो सौजन्य - pinterest
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जगभरातील सर्व देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी UPI One World Wallet लाँच करण्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना रिअल-टाइम डिजिटल पेमेंट अनुभव मिळावा, या उद्देशाने UPI One World Wallet डिझाईन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी भारताने G20 शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेत UPI One World Wallet पहिल्यांदा सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता हे UPI One World Wallet अनेक देशातील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
हेदेखील वाचा – फोन चोरीला गेल्यानंतर ‘या’ सोप्या पध्दतीने ब्लॉक करा UPI आयडी
UPI One World Wallet मुळे मेड इंडिया तंत्रज्ञान परदेशात लोकही वापरू शकतील. यामुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही आणि परकीय चलन व्यवहारातील अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. आपला भारत अनेक संस्कृतींनी समृध्द असलेला देश आहे. आपल्या भारताला शेकडो पर्यटक भेट देतात. आपली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी पर्यटक आपल्या भारतात येतात. तसेच अनेक पर्यटक होळी, दहिहंडी, गणेशोत्सव आणि दिवाळीत सुध्दा आपल्या भारतात येतात. ज्यामुळे त्यांना आपल्या सणांविषयी, आपल्या रुढी परंपरेविषयी माहिती मिळते. पण एखादा पर्यटक जेव्हा आपल्या देशाला भेट देतो, तेव्हा त्याच्यासाठी सर्वात मोठी समस्या असते भारतीय चलन.
आपल्याला कोणत्याही देशात जाण्यापूर्वी त्या देशातील चलन घ्यावे लागते. पण काही वेळा चलन व्यवहारात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. याच ,सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आता भारतात UPI One World Wallet लाँच करण्यात आलं आहे. UPI One World Wallet अनेक देशातील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता कोणीही भारताला भेट दिल्यानंतर त्या व्यक्तिला रोख रक्कम बाळगण्याची किंवा परकीय चलन व्यवहारातील अडणचणींचा सामना कररण्याची गरज नाही. केवळ UPI One World Wallet च्या मदतीने कोणालाही भारतात ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.
हेदेखील वाचा – Mobile AI मुळे आपली जगण्याची पध्दत बदलणार का? Samsung ने केला मोठा खुलासा
पासपोर्ट आणि वैध व्हिसावर आधारित पूर्ण KYC प्रक्रियेनंतर पर्यटक होटेल्स, विमानतळ आणि अशा अनेक ठिकाणी अधिकृत PPI जारीकर्त्यांद्वारे UPI One World Wallet चा लाभ घेऊ शकतात. याबाबत NPCI चे प्रवक्ते म्हणाले की, परदेशातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी कमी करणे हा UPI One World Wallet सेवा सुरू करण्यामागचा उद्देश आहे. UPI हा भारतीयांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पेमेंट पर्याय आहे. ह्याच आवडत्या पेमेंट पर्यायाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय प्रवासी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. परदेशी प्रवाशांना भारताने विकसित केलेल्या रिअल-टाइम पेमेंट प्रणालीचा अनुभव घेता यावा यासाठी UPI One World Wallet लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी फक्त QR कोड स्कॅन करून व्यापारी स्थानांवर पेमेंट करण्यासाठी UPI One World ॲप वापरू शकतात.