स्लो फोन आणि स्टोरेजच्या समस्येने हैराण झालात? बऱ्याच काळापासून वापरले न जाणारे ॲप्स असे करा मॅनेज
आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स असतात. काही ॲप्स ईनबिल्ड असतात तर काही ॲप्स आपण आपल्या कामासाठी डाऊनलोड करतो. अनेकदा असं घडतं की आपण आपल्या छोट्या कामासाठी एखादं ॲप डाऊनलोड करतो आणि आपलं काम झाल्यानंतर देखील ते ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये तसंच ठेवतो, डिलीट करत नाही. अशा प्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक ॲप्स गोळा होतात, ज्यांचा आपण वापर करत नाही. पण अशा ॲप्समुळे आपला स्मार्टफोन स्लो होतो आणि स्टोरेजची समस्या देखील निर्माण होते.
हेदेखील वाचा- शॉपिंग सोबत आता डॉक्टरांचा सल्लासुद्धा मिळणार, Amazon Clinic सर्विस भरतात लाँच!
अनेक वेळा असे घडते की आपण आपल्या फोनवर खूप ॲप्स डाउनलोड करतो. परंतु, प्रत्यक्षात त्यांचा वापर करत नाही. अशी ॲप्स केवळ फोनवर निष्क्रिय राहत नाहीत तर या ॲप्समुळे तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज देखील वापरलं जातं. या ॲप्समुळे तुमचा स्मार्टफोन स्लो होतो. अशावेळी हे ॲप्स डिलीट करणं हा एकमेव मार्ग आपल्याकडे असतो. पण यामध्ये देखील एक समस्या आहे, ती म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण वापरत नसलेले ॲप्स शोधणं. असे ॲप्स शोधणे सोपं नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही Android आणि iOS दोन्हीमध्ये वापरत नसलेले ॲप्स अगदी सहज शोधू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- itel S25 सीरीजची अफोर्डेबल प्राइजमध्ये एंट्री, 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
काही ॲप्स, जसे की Files by Google किंवा थर्ड पार्टी ॲप मॅनेजर, न वापरलेले ॲप्स ओळखण्यात मदत करू शकतात आणि स्टोरेज मोकळं करण्यासाठी न वापरलेल्या ॲप्सना डिलीट करण्यासाठी मदत करू शकतात.