Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

पॅन कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर काय करावं याबाबत अनेकांना माहिती नसतं. पण अशावेळी घाबरून न जाता तुम्ही एफआयआर दाखल करून रिप्रिंट पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. ही प्रोसेस अतिशय सोपी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2025 | 07:04 AM
PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • महत्त्वाच्या सरकारी डॉक्यूमेंट्सपैकी एक म्हणजे पॅन कार्ड
  • पॅन कार्ड हरवल्यास रिप्रिंट करण्याची सुविधा मिळते
  • पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी काही महत्त्वाच्या डॉक्यूमेंट्सची गरज असते
सध्याच्या काळात पॅन कार्ड महत्त्वाच्या सरकारी डॉक्यूमेंट्सपैकी एक आहे. बँक अकाऊंट ओपन करायचे असेल, इनकम टॅक्स रिटर्न फाइल करायचे असो किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम असो सर्वांसाठी आपल्याला पॅनकार्डची गरज असते. अशा परिस्थितीत जर तुमचं पॅन कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचं पॅन कार्ड रिप्रिंट करू शकता. पॅन कार्ड रिप्रिंट करण्याची सुविधा Protean (यापूर्वी NSDL) आणि UTIITSL द्वारे उपलब्ध आहे. या पॅन कार्ड सेवांसाठी अधिकृत एजेंसी आहेत.

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

पॅन कार्ड कोण रिप्रिंट करू शकतं?

ही सुविधा केवळ अशा लोकांसाठी उपलब्ध आहे, ज्यांना त्यांच्या पॅन कार्डमध्ये कोणताही बदल करायचा नाही. म्हणजेच नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो मध्ये कोणताही बदल नको आणि फक्त जुन्या पॅन कार्डची डुप्लिकेट कॉपी पाहिजे अशा लोकांसाठी ही सुविधा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी या डॉक्युमेंट्सची गरज

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणं अत्यंत गरजेचं आहे.

  • तुमचा विद्यमान पॅन क्रमांक
  • आधार नंबर
  • जन्मतारीख
  • आधारला लिंक असलेला मोबाईल किंवा ईमेल (ओटीपीसाठी)
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीपीशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

ऑनलाईन पॅन रीप्रिंट कसं कराल?

  • पॅन कार्ड रीप्रिंट करण्यासाठी ऑनलाईन पद्धत अगदी सोपी आहे. या प्रक्रियेत 15 ते 20 दिवसांत जुन्या पॅन कार्डचे डुप्लिकेट कॉपी तुम्हाला मिळते. .
  • सर्वात आधी Protean (NSDL) च्या अधिकृत पॅन वेबसाईटवर जा. UTIITSL च्या वेबसाईटवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे.
  • “रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड” हा पर्याय निवडा. तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये कोणताही बदल करायचा नसेल तेव्हाच हा पर्याय निवडा.
  • तुमचा पॅन नंबर, आधार नंबर,जन्मतारीख आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.
  • डिक्लेरेशन बॉक्सवर टिक करा. कॅप्चा भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता ओटीपी वेरिफिकेशन करा. ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेलवर येईल.
  • आता पेमेंट करा.
  • भारतात पॅन कार्ड डिलिव्हरी चार्ज 50 रुपये आहे
  • भारताबाहेर डिलिव्हरी चार्ज 959 रुपये आहे
  • पेमेंट UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे केले जाऊ शकते.
  • पेमेंट केल्या नंतर तुम्हाला 15 अंकी अ‍ॅकनॉलेजमेंट नंबर मिळेल. याच्या मदतीने तुम्ही प्रोसेस ट्रॅक करू शकता.

पॅन कार्ड कसं मिळणार?

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फिजिकल पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. तसेच ई-पॅन (डिजिटल कॉपी) तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर पाठवली जाईल. जर तुमचं पॅन कार्ड चोरी झालं असेल किंवा कुठे हरवलं असेल तर तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून पोलिसात एफआयआर दाखल करणं महत्वाचं आहे. कारण काही वेळेस डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करताना एफआयआर कॉपी मागितली जाते.

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

ऑफलाईन पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

जर तुम्हाला ऑनलाइन पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचे नसेल तर तुम्ही ऑफलाईन देखील ही प्रोसेस फॉलो करू शकता.

  • NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाईटवरून पॅन फॉर्म डाउनलोड करा.
  • हा संपूर्ण फॉर्म ब्लॉक लेटर्समध्ये भरा.
  • दोन पासपोर्ट साइज फोटो, ओळखापत्र, एड्रेस प्रूफ आणि जुन्या पॅनची कॉपी असे सर्व कागदपत्रे जोडा.
  • हा फोन जवळच्या पॅन सर्विस सेंटरमध्ये जमा करा.
  • आता तुम्हाला अ‍ॅकनॉलेजमेंट नंबर मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन स्टेटस ट्रॅक करू शकता.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पॅन कार्ड म्हणजे काय?

    Ans: पॅन (PAN) कार्ड हा आयकर विभागाकडून दिला जाणारा 10 अंकी ओळख क्रमांक आहे.

  • Que: पॅन कार्ड कशासाठी वापरतात?

    Ans: कर भरणे, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि मोठे आर्थिक व्यवहारासाठी.

  • Que: पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

    Ans: NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.

Web Title: How to reprint pan card know about the offline and online process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 07:04 AM

Topics:  

  • pan card
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.