Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Geyser Tips: हिवाळ्यात गिझर वापरताय? गिझरचा वापर करताना सुरक्षित राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स जाणून घ्या. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही हिवाळ्यातील "टाइमबॉम्ब" पासून स्वतःचे रक्षण करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 27, 2025 | 07:55 PM
Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • गिझर वापरताना केली ही चूक तर सेकंदात होऊ शकतो धमाका
  • गिझरमधील लपलेला धोका समजला नाही तर हिवाळा ठरू शकतो जीवघेणा
  • सुरक्षित राहण्यासाठी जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हिवाळ्यात गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकं पाणी गरम करण्यासाठी हिटरऐवजी गिझरचा जास्त वापर करतात. काही लोकं पाणी गरम करण्यासाठी दिर्घकाळ गिझर चालू ठेवतात. ज्यामुळे मशीनवर अतिरिक्त दबाव येतो. सतत हिटींग चालू ठेवल्यास टँकच्या आतमध्ये प्रेशर वाढते आणि जर सुरक्षेची व्यवस्था केली नसेल तर यामुळे ब्लास्ट होण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अनेक ठिकाणी तर गीझरचा ब्लास्ट झाल्यामुळे लोकं जखमी झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा

गीजर ब्लास्ट होण्याची खरी कारणं कोणती आहेत?

जास्त प्रमाणात गीझर ब्लास्ट होण्याच्या घटना कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नाही तर निष्काळजीपणामुळे घडतात. सेफ्टी वाल्व जाम होणं, थर्मोस्टॅट योग्य प्रकारे काम नं करणं किंवा वेळोवेळी सर्विस न करणं या सर्व कारणांमुळे गिझरचा ब्लास्ट होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जेव्हा गीझरध्ये पाण्याचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढते आणि पाण्याला बाहेर जाण्याचा रस्ता उपलब्ध नसेल तर टँक ब्लास्ट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बाथरूमची बंद जागा आणि चुकीचे वेंटिलेशन

अनेक घरांमध्ये गीझर बाथरुममधील अशा ठिकाणी लावला जातो, जिथून हवा खेळती राहणं अत्यंत कठीण असतं. बंद आणि ओलसर जागांमध्ये गीझरचा वापर केल्यास गरमी आतमध्ये जमा होते. विशेषत: गॅस गीझरच्या बाबतीत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. योग्य वेंटिलेशन झाले नाही तर विषारी गॅस जमा होऊन ब्लास्ट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे तुमचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो.

गीझर जास्त वेळ चालू ठेवणे

हिवाळ्यात लोकं अंघोळ करण्यापूर्वी गिझर जास्त वेळ चालू ठेवतात. तुम्हाला देखील अशी सवय असेल तर ती वेळेत बदला अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. तुमची ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त वेळ गीझक चालू ठेवल्यास प्रेशर आणि तापमान दोन्ही वाढते. अनेक वेळा लोक आंघोळ केल्यानंतरही गीझर बंद करायला विसरतात, जे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

असं राहा सुरक्षित

काही योग्य सवयी आणि सावध राहून तुम्ही गिझरचा योग्य वापर करू शकता. वेळोवेळी गीझरची सर्विस करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे सेफ्टी वाल्व आणि थर्मोस्टैट योग्य स्थितीत राहतात. अंघोळीला जाण्यापूर्वी गिझर चालू करा आणि तुमचं काम झाल्यानंतर गीझर आठवणीने बंद करा. तुमच्या बाथरूममध्ये योग्य वेंटिलेशन ठेवा आणि जुन्या किंवा सदोष गीझरकडे दुर्लक्ष करू नका. काही सावधगिरी बाळगल्याने या हिवाळ्यातील “टाइमबॉम्ब” पासून स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण होऊ शकते.

Web Title: Geyser can blast because of this mistakes stay alert while using tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख
1

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

John Cena फॅन्ससाठी अनोखं सरप्राईज! Google वर नाव टाइप करताच स्क्रीनवर दिसेल खास इफेक्ट, आत्ताच करा ट्राय
2

John Cena फॅन्ससाठी अनोखं सरप्राईज! Google वर नाव टाइप करताच स्क्रीनवर दिसेल खास इफेक्ट, आत्ताच करा ट्राय

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Free Fire Max: एक चूक आणि गेम संपला! ‘या’ कारणांमुळे बॅन होऊ शकतं तुमचं गेमिंग अकाऊंट, सावध व्हा
4

Free Fire Max: एक चूक आणि गेम संपला! ‘या’ कारणांमुळे बॅन होऊ शकतं तुमचं गेमिंग अकाऊंट, सावध व्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.